आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : के. के. वाघ ते जत्रा हाॅटेलपर्यंत वर्षभरात उभारणार उड्डाणपूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वाधिक वर्दळीमुळे अंडरपास नसल्याने सातत्याने अपघातांना निमंत्रण ठरलेल्या के. के. वाघ ते जत्रा हाॅटेलपर्यंतच्या महामार्गावर येत्या वर्षभरात २.३ किलाेमीटरचा उड्डाणपूल उभारला जाणार अाहे. याकरिता शुक्रवारी झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत ४०४ काेटी रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. २७ एप्रिलला या कामाची निविदा प्रक्रिया सुरू हाेईल, त्यानंतर साधारणत: महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण हाेईल त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात हाेऊन वर्षभरात हा उड्डाणपूल बांधून पूर्ण हाेण्याची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी िदली. अपघातांची वाढती संख्या अनेकांना अापला जीव गमवावा लागल्याने शहरवासीयांत संताप असून, यापूर्वी या मागणीसाठी तीव्र अांदाेलनेही झाली असल्याने हा उड्डाणपूल हाेण्याची नितांत गरज अाहे. 
 
नाशिक शहराच्या मध्यवस्तीतून गेलेल्या मुंबई-अाग्रा महामार्गावर बांधण्यात अालेल्या ६.१ किलाेमीटर लांबीचा उड्डाणपूल जागाेजागी उतरविण्यात अाला असल्याने इंदिरानगर, बळी मंदिर, के. के. वाघ काॅलेज, जत्रा हाॅटेल क्राॅसिंगच्या ठिकाणी ‘बाॅटल नेक’ तयार झाल्या असून, वाहतूक काेंडीसह अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाली अाहेत. त्यातल्या त्यात के. के. वाघ महाविद्यालयाजवळ दरराेज हजाराे विद्यार्थी हा महामार्ग अाेलांडतात, त्यातून काही अपघातही घडले अाहेत. हीच स्थिती नागरिकांच्या बाबतीत असून, जत्रा हाॅटेल, रासबिहारी चाैफुली अतिशय धाेकादायक बनली असून, उड्डाणपूल िकंवा अंडरपास द्यावा याकरिता यापूर्वी या परिसरातील नागरिक रस्त्यावरही उतरले अाहेत. तसेच अांदाेलनेही झाली अाहेत. 

या सर्व बाबी लक्षात घेत त्या अनुषंगाने मागील वर्षी ३० एप्रिल राेजी खासदार हेमंत गाेडसे यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एल अॅण्ड टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली हाेती. त्यानुसार या २.३ किलाेमीटरच्या उड्डाणपुलाला तत्त्वत: मान्यता देण्यात अाली हाेती. अाता प्रत्यक्षात निधी मंजूर झाला असल्याने उड्डाणपुलाचे हे काम लवकरात लवकर पूर्ण हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. 

सदाेष अाराखडा अन‌् अनेक त्रुटी 
अत्याधुनिक स्टर्टेड तंत्रज्ञानाने उभारण्यात अालेल्या या ६.१ किलाेमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची बांधणी करताना अाराखड्यात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचे अनेक स्थापत्य अभियंत्यांनी वारंवार म्हटले अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही याबाबत तक्रारी करण्यात अाल्या अाहेत. जेथे जेथे पूल उतरविण्यात अाला तेथे तेथे अपघात घडले असून, जीव मुठीत धरून नाशिककरांना रस्ता अाेलांडावा लागत अाहे. जत्रा चाैफुलीजवळ तर ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगराेड महामार्गाला क्राॅस हाेताे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त अाहे. 
 
सर्व्हिसराेडची रुंदी कमी 
के. के. वाघ महाविद्यालयाजवळच नाही तर सर्वत्रच सर्व्हिसराेडची रुंदी कमी असून, त्यावर अतिक्रमणे अन् बेकायदा पार्किंग जागाेजागी अाहेत. त्यामुळे जीव धाेक्यात घालून नाशिककरांना प्रवास करावा लागताे. उड्डाणपुलावरून उतरण्यासाठी चढण्यासाठीचे पाॅइंट भरचाैकात देण्यात अाले अाहेत, पण नियमाप्रमाणे ते चाैकाच्या पाचशे मीटरपुढे किंवा अगाेदर देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे अाहे. यामुळे द्वारका सर्कलसारख्या मुख्य चाैकात
वाहनाची गर्दी हाेते वाहतूक काेंडी हाेते, याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे अाहे. 
 
वर्षभरात पूल हाेणार पूर्ण 
सातत्याने पाठपुरावाकेल्यानंतर अाता ४०२ काेटी रुपयांचा िनधी मंजूर झाला असल्याने के. के. वाघ ते रासबिहारी चाैकादरम्यानचा हा पूल येत्या वर्षभरात पूर्ण हाेणार अाहे. या परिसरातील नागरिक, विद्यार्थी अाणि नाशिककरांना यामुळे दिलासा मिळणार अाहे.
-हेमंत गाेडसे, खासदार 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
    
बातम्या आणखी आहेत...