आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळवण प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना कोंडले, १७०० विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण- एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहात १७०० विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वसतिगृहातील प्रवेश संख्या वाढवून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकल्प कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास कोंडण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडा, अशी मागणी करीत प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे आदिवासी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासंदर्भात प्रधान सचिव वरिष्ठ यंत्रणेची बैठक सुरू असून, येत्या आठ दिवसांत सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आदिवासी आयुक्तालयातील अपर आयुक्तांकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, संजय पवार, प्रवीण रौंदळ, सागर खैरनार, जितेंद्र पगार, मनोहर बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.