आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘कालिदास’चा पडदा राहणार बंदच; शिवसेनेपाठाेपाठ भाजपलाही अायुक्तांचा थांबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सांस्कृतिक चळवळ जडणघडणीचे केंद्र, कलावंतांचे श्रद्धास्थान असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी १६ जूलैपासून बंद हाेणारा पडदा अखेर वर्षभरासाठीच बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला असून, शिवसेनेपाठाेपाठ भाजपचा अर्थातच शासनाचा कार्यक्रमही या ठिकाणी साजरा करण्याचे टाळले अाहे. अाता कालिदास कलामंदिर इ-अनावरणाचा कार्यक्रम महापालिका भवनात घेण्याचा विचार सुरू अाहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून दूरावस्थेच्या फेऱ्यात असलेल्या कालिदास कलामंदिरावरून महापालिका प्रशासनावर जाेरदार टीका झाली हाेती. अाघाडीचे कलावंत असलेले माेहन जाेशी, प्रशांत दामले यांनी स्थानिक कलाकारांच्या राेषात हुंकार भरल्यानंतर त्याची तीव्रता वाढली हाेती. अत्यंत संवेदनशील अशा वर्गाची नाराजी प्रशासन तत्कालीन सत्ताधारी असलेल्या मनसेनेही परवडणारी नसल्याचे हेरून तत्काळ कालिदासच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. त्यासाठी काेटी रुपये मंजूर करून पडद्यापासून तर संगीतव्यवस्था, खुर्ची अन्य किरकाेळ कामेही करण्याचे ठरले हाेते. या कामासाठी कालिदास वर्षभर बंद ठेवले जाणार हाेते त्यासाठी १६ जुलैनंतर पडदा खाली अाणला जाणार हाेता. तत्पूर्वी कालिदासला अभिवादन करण्यासाठी स्थानिक कलावंतांनी १५ जुलै राेजी विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या सांगता साेहळ्यानंतर शिवसेनेने वाहतूक सेनेच्या कार्यक्रमासाठी कालिदासची मागणी केल्यामुळे काय करायचे असा पेच हाेता. 

‘दिव्य मराठी’ने त्यावर प्रकाश टाकल्यानंतर शिवसेनेने स्वत:हून कलावंतांचा सन्मान ठेवत कार्यक्रम स्थलांतरित केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी कालिदासच्याच इ-अनावरणाचा कार्यक्रम शासन अर्थातच भाजपकडून हाेणार असल्याचे वृत्त अाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कार्यक्रमाला शिवसेनेने अाक्षेप घेतला हाेता. मुंबईत जीएसटी धनादेश वाटप साेहळ्यात शिवसेना भाजपत झालेला वाद ताजा असताना नाशिकमधील कार्यक्रमाला शिवसेनेने हरकत घेतल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. अखेर अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी कालिदासच्या इ-अनावरणाचा कार्यक्रम पालिकेत घेण्याचा निर्णय घेतला अाहे. इ-अनावरणाचाच विषय असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या उद‌‌्घाटनाप्रसंगी ज्या पद्धतीने स्क्रीन लावण्यात अाला हाेता, तशीच व्यवस्था करून वाद टाळण्याचा प्रयत्न हाेणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...