आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकार अाणि रसिकांना अाता प्रतीक्षा नवीन पडदा उघडण्याची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी काालिदास कलामंदिराचे नूतनीकरण व्हावे, यासाठी गेल्या दाेन-तीन वर्षांपासून रंगकर्मी, कलाकार, माध्यमे अाणि रसिकही झटत हाेते. अखेरीस महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांची कुंभकर्णी झाेप संपली, अधिकाऱ्यांचीही निद्रावस्था कमी झाली अाणि कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण हाती घेण्यात अाले. त्यासाठी १६ जुलैपासून नाट्यगृह किमान एक वर्षासाठी बंद राहणार अाहेे. म्हणूनच शहरातील विविध संस्थांचे कलाकार एकत्र येत शनिवारी (दि. १५) ‘तीन पैशांचा तमाश’ या नाटकातून या जुन्या वास्तूला अभिवादन करण्यात अाले. यावेळी नाटक संपल्यावर मुद्दामच पडदा पाडण्यात अाला नाही. 
 
गेल्या ३०-३२ वर्षांपासून ‘कालिदास’मध्ये किराकाेळ देखभाल-दुरुस्ती हाेत हाेती. पूर्ण नूतनीकरण एकदाही झाले नव्हते. कलाकारांना माेठ्या त्रासाला सामाेरे जावे लागत हाेते. स्थानिक कलाकार, माध्यमांनी अावाज उठवल्यानंतर त्याला व्यावसायिक नाटक करणाऱ्या काही ज्येष्ठ कलाकारांनीही साथ दिली अाणि हा प्रश्न गेल्या दाेन-तीन वर्षांपासून तीव्रतेने मांडल्यानंतर काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडून नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात अाला. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशनतर्फे तब्बल नऊ काेटी रुपयांची तरतूदही करण्यात अाली अाहे. रेट्राेफिटिंग प्रकल्पांतर्गत हे काम हाेणार अाहे. नूतनीकरणाचे संपूर्ण काम मुंबईच्या न्यू इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात अाले अाहे. 


‘रुढी परंपरांच्या जाेखाडात अडकलेला मनुष्य जसजसा जाेखाडाला विराेध करू पाहताे, तसतसा त्यात अडकतच जाताे. त्याची सुटका हाेत नाही. समाज त्याची सुटका हाेऊच देत नाही’, असा अाशय असलेली महेश एलकुंचवार लिखित, रवींद्र ढवळे दिग्दर्शित एकांकिका एन. एन नाशिक या संस्थेच्या इंटिमेट थिएटर विभागातर्फे सादर झाली. वेगळा विषय अाणि वेगळ्या मांडणीने एकांकिकेने रसिकांची मने जिंकली. 

मुंबई नाका येथील भगवंतनगर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या सभागृहात या एकांकिकेचा प्रयाेग उत्साहात सादर झाला. एकांकिकेत अविनाश देशपांडे, धनंजय वाबळे, पीयूष नाशिककर आणि पल्लवी पटवर्धन यांच्या भूमिका हाेत्या. ध्वनी संयोजन रामेश्वर ढापसे यांनी केले. अनादिकालापासून मनुष्य हा रुढी, परंपरा, सामाजिक बंधने यांचा गुलाम असतो. या गोष्टी कालबाह्य झाल्या तरी मानवाची त्यापासून सुटका नसते. खरेतर त्या बारदानात बांधून ठेवण्याइतपत जुन्या जर्जर झालेल्या असूनही त्या माणसाला आपल्यामागून फरफटत नेत असतात. कुणी सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला समाजरूपी कोल्हे, लांडगे चहूबाजूने खायला उठतात आणि अखेर त्याला त्यांनाच शरण जावे लागते. असेच बंड करून उठलेल्या समाजातील विविध स्तरातील तीन तरुणांची कहाणी म्हणजे एका म्हाताऱ्याचा खून ही एकांकिका. 
 
‘एका म्हाताऱ्याचा खून’ एकांकिकेने जिंकली मने 
१५ जुलै २०१४ राेजी दिव्य मराठीच्या डी. बी. स्टारच्या माध्यमातून कालिदासच्या समस्यांवर तीव्रतेने प्रकाश टाकण्यात अाला हाेता. त्यानंतर ठाेस निर्णयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यता अाला. अखेरीस पालिकेला दखल घ्यावी लागली अाणि बराेबर १५ जुलै २०१७ पासून नूतनीकरणासाठी ‘कालिदास’ बंद ठेवण्यात अाले. 
 
नूतनीकरणासाठी कालिदास कलामंदिर वर्षभर बंद राहणार अाहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. १५) शहरातील विविध संस्थांच्या कलाकारांनी एकत्र येत ‘तीन पैशांच तमाशा’ हे नाटक सादर करून मंचाला अभिवादन केले. 

गेल्या तीन वर्षांत ‘कालिदास’च्या मंचावर अनेक कलाकार घडले. म्हणूनच या रंगमंचापुढे नतमस्तक हाेण्यासाठी राजेश शर्मा यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशांचा तमाश’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात अाले. 

सुरभी थिएटर्सच्या माध्यमातून जरी हे नाटक झाले असले तरी शहरातील विविध संस्थांच्या कलाकारांनी एकत्र येऊन महाकवी कालिदासच्या रंगमंचापुढे एकत्रीत नतमस्तक व्हावे हा त्यामागील उद्देश हाेता. हाच प्रयत्न शर्मा यांनी केला. त्याला शहरातील कलाकारांनी प्रतिसादही दिला. मंचावर २५-३० कलाकार तर बॅकस्टेजलाही २५ कलाकार अशा माेठ्या चमूने मिळेल ती सेवा देत ‘कालिदास’प्रती अापली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला रसिकांमध्ये फक्त कलाकारच नाही तर शहरातील नवाेदित अाणि ज्येष्ठ कलाकारही उपस्थित हाेते. यावेळी नाटक झाल्यानंतर मुद्दामच पडदा पाडण्यात अाला नाही. लवकरात लवकर काम व्हावे अाणि नवीन रंगमंचावर प्रयाेग करण्याची संधी मिळावी, असे साकडे यावेळी सर्वच कलाकारांनी रंगदेवतेला घालत जुन्या वास्तूतील तांत्रिक बाजू अाणि मंचाला निराेप दिला. 

या नाटकाचे दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे हाेते तर संगीत संयाेजन राजन अग्रवाल, अजय गायकवाड, नेपथ्य सुनील परमार, प्रकाशयाेजना विनाेद राठाेड, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा प्रिया तुळजापूरकर यांची हाेती. तर नाटकात प्रशांत हिरे, सचिन शिंदे, श्रीपाद काेतवाल, विजय शिंगणे, राजेश अाहेर, डी. डी. पवार, शिवा देशमुख, किरण कुलकर्णी, सतिश वराडे, अानंद गांगुर्डे, राहुल काकड, राहुल सुर्यवंशी, महेश बेलदार, शुभम लांडगे, जयप्रकाश पुराेहित, राजू क्षीरसागर, लक्ष्मी पिंपळे, कविता अाहेर, पूनम देशमुख, कीर्ती नागरे, स्वाती माळी, स्वरांजली हरदास, तेजस्विनी देव, स्वाती शेळके यांच्या भूमिका हाेत्या.