आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केबीसी’ घाेटाळ्याचा तपास थंडावला, भाऊसाहेब अारती चव्हाण सीअायडी पथकाच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बहुचर्चित केबीसी घोटाळ्याचा सूत्रधार भाऊसाहेब आणि पत्नी आरती हे चव्हाण दांपत्य सध्या पुणे सीआयडीच्या कोठडीत आहेत. परभणी येथील गुन्ह्यात सीआयडीने त्यांचा ताबा घेतला आहे. दरम्यान, केबीसीच्या एजंटवरांवरही कारवाई होण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, अाजवर एका पोलिस कर्मचाऱ्याव्यतिरिक्त एकाही एजंटची चौकशी झाली नसल्याने तपासावर संशय व्यक्त होत आहे.

भाऊसाहेब आरती यांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांच्या बँक लॉकरमधून २२ किलो सोने-चांदीची सुमारे सात कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. नांदेड, परभणी पाेलिसांकडेही त्यांचा ताबा देण्यात अाला. सध्या चव्हाण दांपत्य पुणे सीआयडीच्या कोठडीत आहेत. केबीसी कंपनी फसवणूक प्रकरणी जालना, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बुलडाणा अशा विविध पोलिस ठाण्यात १८ गुन्हे दाखल आहेत. सर्वांना तपासाकरिता चव्हाण याचा ताबा पाहिजे असल्याने चव्हाण दांपत्याची कोठडीची वारी आणखी दोन वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे.

जप्तीचीकारवाई : केबीसीकंपनीची जालना, परभणी येथे मालमत्ता अाढळून आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीने ही मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. सुमारे २० कोटींची मालमत्ता असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हार्ड डिस्क ताब्यात
केबीसीकंपनीच्या व्यवहाराची हार्डडिस्क फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कलिना येथे हार्डडिस्क घेण्याकरिता गेले आहे. ती हार्डडिस्क ताब्यात आल्यानंतर केबीसी कंपनीच्या तपासाला गती मिळू शकते. केबीसी कंपनीचा फरार संशयित जैन नामक व्यक्तीचा पथकाकडून शोध सुरू आहे. आजपर्यंत केबीसी फसवणूक प्रकरणात १० संशयितांना अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...