आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वी सबज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा: मुलांच्या गटात महाराष्ट्राला विजेतेपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंसमवेत शरद पवार, औरंगाबाद संघटनेचे गोविंद शर्मा आदी. - Divya Marathi
महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंसमवेत शरद पवार, औरंगाबाद संघटनेचे गोविंद शर्मा आदी.
नाशिक  - महाराष्ट्राच्या मुलांनी २८ व्या सबज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतपदाची हॅट््ट्रिक केली आहे.  मात्र मुलींच्या गटात गेल्या तीन वर्षांपासून सतत हुलकावणी मिळत असलेल्या कर्नाटकाने महाराष्ट्राचे सलग तेरावे विजेतेपद रोखले.  या स्पर्धेसाठी असलेला सर्वोत्कृष्ट ‘भरत’ पुरस्काराचा मान महाराष्ट्राच्या चंदू चावरे (नाशिक)  याने तर ‘ईला’चा मान कर्नाटकाच्या बी. चैत्रा हिने मिळविला.  

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याचा शुभम थोरातची शानदार संरक्षणाची खेळी आणि नाशिकच्या चंदू चावरेच्या (१.३० नाबाद व १.१५ मि. व गुण) अष्टपैलू खेळीच्या जोरावर मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर ११-३ अशी सात गुणांनी मात केली. मध्यंतराची ६-२ ही आघाडीच महाराष्ट्रास विजेतेपदाची हॅट््ट्रिक मिळवून दिली. मुंबई उपनगरच्या धीरज भावेने २.२० मिनिटे पळती तर पुण्याचा साहिल चिकणे व सोलापूरच्या रामजी कश्यप यांनी आक्रमणात प्रत्येकी ३ गडी टिपले.  महाराष्ट्राने ४ गडी सूर मारून तर आंध्रने १ गडी सूर मारून बाद केला. आंध्रच्या कन्ना नायडूने (१.३० व २.०० मिनिटे) व के. किशोरने १.५० व १.३० मि.) संरक्षण करीत लढत दिली.    
 
स्पर्धेतील २८ विजेतेपदे अशी
मुले : कर्नाटका १७, महाराष्ट्र ७, आंध्र १, पश्चिम बंगाल ३.  
मुली : महाराष्ट्र १३, कर्नाटका ११, पश्चिम बंगाल २, पंजाब २.
 
कर्नाटकच्या मुलींचा महाराष्ट्रावर विजय
मुलींच्या अंतिम सामन्यात कर्नाटकाने महाराष्ट्रास ६-५ असे एक गुण ३० सेकंद राखून नमविले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मध्यंतराची ३-२ ही एका गुणाचीच आघाडी महाराष्ट्रास महागात पडली.  बी. चैत्रा त्यांच्या विजेतेपदाची मानकरी ठरली.महाराष्ट्राकडून नगरच्या वैष्णवी पालवे (२.३० व १ मिनिटे), साक्षी वाफळेकर (१.३० व २.२०) व औरंगाबादची मयुरी पवार (२.००, २.४० मि) व ऋतिका राठोडने (२ गुण) यांनी प्रयत्न केले. मात्र, ते अपुरे पडले.  
 
बातम्या आणखी आहेत...