आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीसाेबत लगट केल्याच्या संशयावरून हमालाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रेयसीसाेबत लगट केल्याचा संंशयावरून एका हमालाने दुसऱ्या हमालाची नाशकातील पंचवटीमध्ये हत्या केली. दीपक अहिरे (२५) असे  मृत हमालाचे नाव आहे. याप्रकरणी हरीश भास्कर याला अटक झाली आहे. दीपकचा शनिवारी रात्री ४-५ जणांनी चॉपरने वार करून खून केल्याचे उघडकीस आले होते. हरीश हा घटनेच्या दिवसापासून फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही दिवसांपूर्वी दीपक व हरीशचे  प्रेयसीवरुन भांडण झाले होते. या रागातूनच ही हत्या केल्याचे उघड झाले. 
बातम्या आणखी आहेत...