आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: रागाच्या भरात पाेटात चाकू खुपसून पत्नीचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पती आणि पत्नीच्या नेहमीच्याच भांडणाचे रूपांतर कशात घडू शकते याचे उदाहरण वडाळागाव भागात पहायला मिळाले. अति भांडण मनातील राग यातून संतापलेल्या पतीने थेट पत्नीची जीवनयात्राच संपवून टाकली. पत्नीच्या पोटात चाकू खुपसल्याने ती ठार झाली. 
 
मूळचे परभणी येथील मात्र रोजंदारी कामानिमित्त वडाळागाव भागात राहणारे जिवाजी पहाडे त्यांची पत्नी सुरेखा पहाडे यांच्यात नेहमीच वादावादी होत होती. सोमवारी वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. संतापलेल्या जिवाजी याने पत्नी सुरेखा पहाडे (२८) हिच्या पोटात चाकू खुपसला. यामुळे पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. सुरेखा हिच्या दिराने तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्रावाने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 
या घटनेबाबत इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपी जिवाजी पहाडे यास अटक केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. हातावर मोलमजुरी करणारे दोघेही पती-पत्नी केवळ वादामुळे या चुकीच्या मार्गाला वळले आणि यात एकाचा मृत्यू झाला. पोलिस तपासात अनेक बाबी समोर येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...