आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिचिकित्सेने ‘ताम्रपत्र’ राहिले कागदावरच, पूर्वसंध्येपर्यंत मजकूर निश्चित करण्यासाठी खल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आखाडाध्वजारोहणाचे यजमानपद भूषविणाऱ्या नाशिक महापालिकेचे ‘एकूणच कर्तृत्व’ ‘मॅनेजमेंट स्किल’ मान्यवरांच्या चिरकाल स्मरणात राहावे, यासाठी ताम्रपत्राद्वारे संबंधितांना सन्मानित करण्याचा खटाटोप निव्वळ एका संस्कृत‘प्रवीण’ अधिकाऱ्याच्या अट्टहासामुळे कागदावरच राहिल्याची धक्कादायक चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येपर्यंत मजकूर निश्चित करण्यासाठी एका अधिकाऱ्याने हातात जणू काही भिंग लावून एकापाठाेपाठ एक त्रुटी काढण्याचाच सपाटा लावल्यामुळे सकाळपर्यंत ताम्रपत्र तयार करण्याची बाब कागदावरच राहिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत काेणाही अधिकाऱ्याने अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळल्यामुळे ताम्रपत्राची संकल्पना का बारगळली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पर्वणीला आखाड्यांच्या ध्वजारोहणातून सुरुवात होत असल्यामुळे यजमान तथा आयोजक म्हणून पुढे आलेल्या महापालिकेने चोख नियोजनासाठी कंबर कसली. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर असल्यामुळे त्यांना चिरकाल स्मरणात राहील, असे स्मृतिचिन्ह देण्याची कल्पना पुढे अाली. त्यातून ताम्रपत्रासारखा पुरातन ऐतिहासिक दस्तावेज देण्यासाठी जवळपास तीन लाखांची तरतूद झाली मक्तेदारही निश्चित झाला. अर्थात, मक्तेदाराची भूमिका निव्वळ ताम्रपत्रनिर्मिती करण्यापुरती हाेती. त्याचा मजकूर निश्चित करून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांची होती. मात्र, ताम्रपत्रात चुकीचा मजकूर जाणार नाही वा संस्कृत भाषेतील संदेशात अर्थाचा अनर्थ होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वारंवार तपासणीचा सपाटा सुरू झाला. त्यात काही अतिप्रवीण अधिकाऱ्यांनी त्रुटींचा सपाटा लावल्याने म्हणे मंगळवारी रात्रीपर्यंत मजकूर निश्चितीसाठी घोळ सुरू राहिला. अखेर रात्री कसाबसा मजकूर निश्चित झाल्यावर पुढे मक्तेदाकडे काम दिले गेले. मात्र, ताम्रपत्राची छपाई म्हणजे निव्वळ कागदाची झेरॉक्स काढणे आधुनिक यंत्राद्वारे एका क्लिकसरशी फ्लेक्स वा हाेर्डिंगसाठी प्रत काढण्यासारखा प्रकार नसल्यामुळे सकाळपर्यंत हे काम तडीस लावणे अशक्य झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या प्रकाराविषयी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार देत माैन बाळगणेच पसंत केले.
निम्म्या नगरसेवकांची पाठ
पुरोहितसंघाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी योग्य मानसन्मान मिळाल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत, महापालिकेने यावेळी नगरसेवकांसाठी स्वतंत्र मंडप उभारून सन्मानाने स्थान दिले. प्रत्यक्षात मात्र ६५ नगरसेवकांनीच हजेरी लावल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. प्रत्येक नगरसेवकाला स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. थोडक्यात, जवळपास निम्मे नगरसेवक कार्यक्रमाला हजरच राहिले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
फुकाचा खटाटोप