आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रज बाबूराव बागुल पुरस्कारांचे आज वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार बाबूराव बागुल कथालेखन राज्य पुरस्काराचे वितरण गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येणार आहे. 
एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे स्वरूप असलेल्या या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांची निवड झालेली आहे. तर सन २०१६ चा बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथालेखक मेनका बाबूराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहासाठी जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन असतील. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अावाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे विद्यार्थी कल्याण बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...