आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्यांच्या नावाने नाशिकच्या अभिमानाचा डांगाेरा पिटवला जाताे... एवढेच काय तर ज्यांच्या जन्मदिनाला मराठी भाषा दिन म्हणून गाैरविण्यात अाले, त्या मराठी भाषेच्या नावावर मते मागितली जातात. नाशिकचे ग्रामदैवत, साहित्यदैवत अशी बिरुदे लावत ज्यांना मिरवले जाते, त्यांचे असे मिरवणे म्हणजे या लाेकांचा केवळ ढाेंगीपणा, देखावा असल्याचे अाज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. साहित्यदैवत कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी दिवसभर शहरातील एकाही नेत्याला त्यांच्या घराकडे फिरकावेसेही वाटले नाही, तर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनाही दुपारी दीड वाजता राेषणाई करण्याची उपरती झाली. 
 
माध्यमांनी जेव्हा नेत्यांना दूरध्वनी करत या संदर्भात विचारले असता काहीतरी उत्तरे देण्यात अाली. पण त्यानंतर संध्याकाळी मात्र धावत-पळत शिवसेनेच्या अाणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना जाग अाली अाणि त्यांनी अखेरीस कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्यांना जनस्थान पुरस्कार देण्यात अाला त्या डाॅ. विजया राजाध्यक्ष या कार्यक्रमाच्या अाधी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गेल्या हाेत्या. त्याच घाईगडबडीत मग नेत्यांनीही अापली कुसुमाग्रज भक्ती दाखवून दिली. 

माझ्या मराठी मातीचा 
नका करू अवमान 
हिच्या दारिद्र्यात अाहे 
भविष्याचे वरदान... 
कुसुमाग्रजांनीलिहिलेल्या ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ या कवितेत या अाेळी लिहिलेल्या अाहेत. मराठी भाषेचे नाशिकच्या स्थानिक नेत्यांसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी अाज जाे अवमान केला अाहे तेच या अाेळींतून उद‌्धृत हाेते. दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी विद्युत राेषणाई करण्यात येते, स्वच्छता करण्यात येते, यंदा मात्र या ठिकाणी काेणीच फिरकल्याचे दिसले नाही. मराठीदिनी जेव्हा माध्यमांनी याकडे लक्ष वेधले, तेव्हा मग सगळ्यांनाच जाग अाली अाणि धावपळ सुरू झाली. दुपारी दीड वाजता मग विद्युत राेषणाई करण्याची उपरती झाली; तर नेहमी मराठी भाषेच्या नावावर मतांचा जाेगवा मागणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांनाही दिवसभर साधे अभिवादन करण्यासाठी तात्यांच्या निवासस्थानाकडे फिरकावेसे वाटले नाही. 

कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे तसेच त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठामुळे नाशिकची देशभरात एक वेगळी अाेळख अाहे. कुठेही गेलाे अाणि सांगितलं की, अापण नाशिकचे तर लाेक कुसुमाग्रजांच्या गावचे म्हणूनच अाेळखतात. त्यावेळी मात्र अभिमानाने छाती फुलवली जाते. साेयीसाेयीने कुसुमाग्रजांचे नाव वापरले जाते. यावेळी तर निवडणुकीतही मराठी भाषेच्या नावावर मराठी मतांना खेचण्याचाही प्रयत्न झाला. ज्यांनी हा प्रयत्न केला, त्यांना भलेही निवडणुकीत यश अाले नसले, पण तरी तात्यांसारख्या साहित्यदैवताला त्यांच्याच जयंतीदिनी विसरावे हे म्हणजे मतांच्या राजकारणासाठीच त्यांचा वापर केल्याचे स्पष्ट हाेते. 

मराठी भाषा गाैरवदिनी तात्यांना अभिवादन करण्यासाठी काेणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्यांच्या निवासस्थानी जाण्याची तसदी घेतली नाही. याबद्दल काही नेत्यांशी संपर्क साधला असता. त्यांनी अाचारसंहितेचे कारण पुढे केले, तर काही नेत्यांनी अाताच निवडणुकीचा थकवा संपताे अाहे. अजूनही अामची काही मंडळी शहराबाहेरच अाहेत. महापालिकेतील विविध पक्षांचे कामही अद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाही. तसेच सध्या जाे निवडणुकीसंदर्भात गाेंधळ सुरू अाहे त्यातही अनेक नेते मंडळी असल्याने या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे या मंडळींनी सांगितले. 
केवळ नेते मंडळीच नाही, तर बाहेर साहित्यविषयक कार्यक्रमांत कुसुमाग्रजांच्या नावाने अभिमानाने मिरवणारे, त्यांच्याच कविता सादर करणारे किंवा त्यांच्या साहित्याचा संदर्भ घेणारे नाशिकमधील साहित्यिक तर साेडाच, पण पावला-पावलावर भेटणारे कवीही कुसुमाग्रजांकडे फिरकले नाही. हीच मंडळी एरवी अाम्ही कुसुमाग्रजांचे वारसदार, अाम्हाला त्यांचाच अादर्श असे सांगत फिरतात अाणि त्यांच्या जयंतीदिनीच त्यांना विसर पडताे यासारखे दुर्दैव ते काय? 
 
लेखिका वीणा गवाणकरांच्या पाेस्टवरून चर्चाचर्वण 
कुसुमाग्रज निवासस्थानाकडे शहरातील काेणताही नेता फिरकला नाही, साहित्यिक अाले नाहीत. हे माध्यमांमध्ये दाखविल्यानंतर लेखिका वीणा गवाणकर यांना एका वाहिनीने सरकारी पाहुणे उपस्थित राहू शकत नसल्याने मराठी भाषा प्रतिमापूजनाचा कार्यक्रम जनस्थानने रद्द केला या विषयावर बाेलण्यासाठी निमंत्रित केले हाेते. पण खरंच कार्यक्रम रद्द केला का. अशी पाेस्ट त्यांनी फेसबुकवर टाकल्याने कार्यक्रमाबद्दल दुपारनंतर चर्चाचर्वण सुरू हाेते. 
बातम्या आणखी आहेत...