आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उर्दू’ भाषेचे धडे अाता मिळणार ‘मराठी’ भाषेत, ‘डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उर्दू आणि अरबी भाषा आता मुस्लिमांपुरतीच मर्यादित राहिली नाही अाणि तसेच काेणतीही भाषा शिकण्यासाठी वयाचे बंधनही राहिलेले नाही. अनेकांना उर्दू शायरीचा अास्वाद उर्दूत घेता येत नाही. हाच विचार करून शहरातील युथ एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल उर्दू शाळेत ‘डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज’ हा उर्दूचा वर्ग सुरू करण्यात अाला अाहे. 
 
कोणत्याही भाषेला देश, प्रांत, किंवा प्रदेश परिसराची मर्यादा नसते. उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा देशापुरतीच मर्यादित राहता परदेशातही गेली आहे. या भाषेतील शेरोशायरीचा आनंद मिळविण्यासाठी भाषेतील गोडवा अनुभवण्यासाठी भाषेचे प्राथमिक ज्ञान सर्वांनाच असणे गरजेचे अाहे.
 
 उर्दू भाषा येत नसल्याची मनातली खंत आता मनातून निघून जावी यासाठीच शहरातील सारडा सर्कल येथील युथ एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल उर्दू शाळेत भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत ‘डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात अाला अाहे. यात उर्दू भाषेच्या तज्ज्ञांकडून शिकवण्यासाठी तेही आपल्या सोयी आणि वेळेनुसार या वर्गाचे नियोजन केले जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या ‘उर्दू’च्या वर्गाचा आतापर्यंत शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आहे. 
 
‘उर्दू’ भाषेबरोबरच ‘अरबी’चे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमात केवळ उर्दू आणि अरबी शिकवण्यावर भर देत नसून तर लिहिणे आणि बोलण्याचेही धडे नागरिकांना दिले जात आहेत. यासाठी खास वह्या आणि अभ्यासक्रमातील पुस्तके मोफत पुरविली जातात. 
 
इच्छुकांना येथे करता येईल नोदणी 
सारडा सर्कल येथील युथ एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल उर्दू शाळेत भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत ‘डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज’ हे उर्दूचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. या वर्गांच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी नागरिकांना ९२२५७९८६४८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...