आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : तीन दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद आणि एक बिबट्या असण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडांगळी - दोन दिवसांपासून दिसणारा बिबट्या वनविभागाने रविवारी लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांना बिबट्या अडकला असल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसानंतर आणखी एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तर खडांगळी परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सुभाष कारभारी ठोक यांना वस्तीजवळील मक्याच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या असल्याची शहानिशा करण्यात आली. रविवारी सायंकाळी लगेचच गट क्रमांक २९४ मध्ये पिंजरा लावण्यात आला. रात्री उशीरापर्यंत बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतो की काय यावर लक्ष ठेवण्यात आले. तथापि, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही.

डरकाळीने बोबडी वळली
दत्तात्रय कोकाटे, सुदाम कोकाटे, सतीश कोकाटे हे नियमितपणे सकाळी लवकर उठून फिरण्यासाठी जात होते. पिंजऱ्याला लावलेल्या बाजरीच्या पेंढ्यांची हालचाल होताना त्यांना दिसली. बिबट्या अडकला असावा अशी शंका त्यांना आली. पेंढी बाजूला करुन डोकावताना बिबट्याने जोरात डरकाळी ठोकली. तिघेही क्षणात काही पावले मागे पळाले. तोंडातून लवकर शब्दही फुटेना. सावध होत त्यांनी ग्रामस्थांना बिबट्या अडकल्याची माहिती दिली.

तिसऱ्या बिबट्याचा वावर 
खडांगळीसह वडांगळी, मेंढी परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी आहे. बिबट्या व दोन बछडे वावरत असल्याचे महिनाभरापूर्वीच निदर्शनास आले होते. यातील एक मादी बिबट्या यापूर्वीच पिंजऱ्यात अ़डकली आहे.
बातम्या आणखी आहेत...