आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विल्होळीनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, ‘दिव्य मराठी’ टीमची बिबट्याला वाचविण्यासाठी मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-नाशिक महामार्गावर विल्होळी नाक्याजवळ शनिवारी (दि. ४) रात्री वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जाेरदार धडक दिली. जखमी झालेला बिबट्या रस्त्यात वेदनेने विव्हळत पडला होता. याचवेळी येथून ‘दिव्य मराठी’च्या प्रिंटिंग प्रेसची टीम जात असताना त्यांनी थांबून ही बाब तातडीने वनविभागाला कळवली बिबट्याला वाचविण्यासाठी मदत केली. मात्र दुर्दैवाने या बिबट्याचा मृत्यू झाला. 
 
शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास डोंगरबाबा या ठिकाणी महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेने तो रस्त्यावर विव्हळत पडला होता. काही दिवसांपूर्वीच श्वानाच्या शोधात बिबट्या सिडको भागात आला होता. विल्होळी नाका येथे श्वान निर्बिजीकरण केंद्र आहे. तसेच, परिसरात शेती झाडांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या भागात अनेक श्वान मोकाट फिरताना दिसतात. कदाचित हा बिबट्या श्वानाला खाण्यासाठी आला असावा. मात्र, रस्ता ओलांडत असताना बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
वनविभागाला दिली तातडीने माहिती 
हा अपघात घडला त्यावेळी ‘दिव्य मराठी प्रिंटिंग प्रेस’ची टीम विल्होळी येथील प्लांटवर जात होती. मात्र, समयसूचकता दाखवत त्यांनी तत्काळ बिबट्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. इतरही वाहने त्याच्या अंगावरून गेली असती. मात्र, टीमने त्याला बाजूला घेतले. वनविभागाला कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. प्रवीण गोरे, दीपक कुमार, राहुल बाजवा, अनुप घाडगे, दिनेश वाडे, चेतन खिलकर, दीपक गारे, चंद्रभान घोलप, किशोर गिरी, विष्णू गुप्ता आदींनी सहकार्य केले. 
 
बातम्या आणखी आहेत...