आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृत्रिम पायांचा २४ अपंगांना आधार; ७५ गरजूंना बेल्ट, वाॅकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लायन्सक्लब नाशिक पंचवटी, लायन्स क्लब नाशिक नाशिक अार्थाेपेडिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व्यक्तींसाठी अायाेजित करण्यात अालेल्या मोफत जयपूर फूट शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला. जयपूर फूटसह पोलिओ कॅलिपर, कंबर पट्टे, विविध प्रकारचे अपंगांचे बूट तसेच चालण्यासाठीची काठी यासाठीच्या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. यात २४ जणांना जयपूर फूट बसविण्यात अाला तर ७५ गरजूंना बेल्ट, वाॅकर काठी वाटप करण्यात अाले.
या शिबिरात ज्या व्यक्तींचे पाय अपघातात किंवा काही कारणांनी काढावे लागले अशा २४ व्यक्तींच्या पायाची मापे घेऊन त्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आले. हातात काठी घेऊन आलेली व्यक्ती स्वत:च्या पायाने चालत घरी जाताना बघून तसेच अनाथ मूकबधिर मुलाचे अपघातात गमावलेले पाय त्याला जयपूर फूटच्या माध्यमातून उभे राहताना पाहून शिबिराचे सार्थक झाल्याची भावना अायाेजकांनी व्यक्त केली. अनेक पोलिओग्रस्त व्यक्तींना पोलिओ कॅलिपर्स देण्यात आले. त्यांच्या पायाची मापे घेऊन त्यांच्या गरजेनुसार बूट बनवून देण्यात आले. तसेच, ७५ जणांना त्यांच्या गरजेनुसार कमरेचे बेल्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्या देण्यात आल्या. काही जणांना चालण्यासाठी उपयुक्त असे वॉकर देण्यात आले.

२१ नोव्हेंबर रोजी नाशिकचे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल विनोद कपूर तसेच जयपूर फूटच्या शिबिराची सुरुवात करणारे माजी प्रांतपाल हसमुख मेहता, प्रांताचे जयपूर फूटचे चेअरमन दीपक मेहता, पुखराज संचेती यांच्या हस्ते या शिबिराला प्रारंभ करण्यात अाला. यावेळी लायन्स क्लब नाशिकचे अध्यक्ष महेश तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या अध्यक्ष वैद्य नीलिमा जाधव यांनी जयपूर फूट शिबिराची आवश्यकता विशद केली. अार्थाेपेडिक असाेसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे यांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. रणकुमार चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. रितू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमास अविनाश कपूर, उषा तिवारी, डॉ. संजय सांगळे, विनोद कोठावदे, प्रशांत सोनजे, डॉ. अमित वराडे, डॉ. पूजा वराडे, रमेश चोतालिया, पूजा चोतालिया, अमित कोटकर, राहुल वेधणे अादी पदाधिकारी अाणि सदस्य उपस्थित होते. या सगळ्या सुविधा अहमदाबादहून खास नाशिकला आलेले शाही हाॅस्पिटलचे चंदुलाल जैन त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे पुरविण्यात आल्या. लायन्स ३२३ या प्रांतातील हे जयपूर फूटचे ४१ वे शिबिर होते. लवकरच लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने लोणी येथे असे शिबिर घेण्यात येणार आहे.

लायन्स क्लब नाशिकचे अध्यक्ष महेश तिवारी लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या अध्यक्ष नीलिमा जाधव यांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन दरवर्षी लायन्सच्या माध्यमातून होईल, असे आश्वासन दिले. या शिबिरात पाय बसवून दिल्याबद्दल अनेक व्यक्तींनी लायन्स क्लबच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...