आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा टंचाईमुळे शहरात 5 तास अघोषित भारनियमन, नाशिककरांचा महावितरणवर संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कोळशाची उपलब्धता कमी झाल्याने त्याचा परिणाम विद्युत निर्मिती घटण्यात झाला अाहे. त्यामुळे राज्यात सध्या महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केले आहे. नाशिक शहरातही सध्या विविध भागांत पाच तासांहून अधिक भारनियमन करण्यात येत असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
 
वातावरणात बदल झाल्यामुळे कधी उन्हाचा तडाखा तर कधी पावसामुळे निर्माण होणारा उकाडा यामुळे शहरवासीय त्रस्त आहेत. त्यामुळे महावितरणने सुरू केलेल्या अघोषित भारनियमनामुळे त्यामध्ये भर पडली आहे. सध्या नाशिक शहरातील पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, पाथर्डी फाटा या परिसरात अघोषित भारनियमन सुरू आहे. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने वातावरणात उकाडा वाढलेला असतानाच वीज नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

तर दाद मागू 
विजेची कमतरता हाेते, त्यावेळी वीज विकत घेता येऊ शकते. त्यामुळे भारनियमनाची गरजच नाही. भारनियमन लादल्यास अाम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू. 
- विलास देवळे, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत  
 
या ठिकाणी सुरू आहे अघोषित भारनियमन 
कालिकामाता मंदिर, गडकरी चौक, रविवार कांरजा, प्रकाश पेट्रोलपंप, गंजमाळ, एन.डी. पटेल रोड, लेखानगर, ठक्कर बाजार, गोविंदनगर, मोरेवाडी, पंचवटी, कृष्णानगर, कलानगर, सारडा सर्कल, जुने नाशिक, फाळके रोड, भद्रकाळी, दहिपूल, इंदिरानगर, कल्पतरूनगर, चुंचाळे घरकुल, सावरगाव, एकतानगर, गोरेवाडी, जाधव संकुल, मखमलाबाद, अश्वमेधनगर, पाथर्डी, सातपूर, दीपालीनगर, जेलरोड, पंचक, हनुमाननगर, शिवाजीनगर 
 
 
बातम्या आणखी आहेत...