आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण समिती सभापतिपदी संजय चव्हाण अविरोध, सेना, भाजपसह काँग्रेसची माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासनाकडून स्थगितीबाबतची टांगती तलवार मनसेतील फाटाफुटीची भीती या पार्श्वभूमीवर चुरशीची ठरू पाहणाऱ्या शिक्षण समितीच्या सभापती उपसभापतिपदाची निवडणूक निव्वळ औपचारिकताच ठरली. शिवसेना, भाजप काँग्रेसने माघार घेतल्यामुळे सभापतिपदासाठी संजय चव्हाण, तर उपसभापतिपदी गणेश चव्हाण यांची अविरोध निवड झाली.

दोन महिन्यांपासून गाजणारी सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक अखेरपर्यंत उत्कंठेचा विषय ठरली. यापूर्वी जुलैला निवडणूक होणार असताना, जुलै रोजी सायंकाळी राज्याच्या नगरविकास खात्याने शिक्षण समितीच बरखास्त केली. त्याविरोधात चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती उठवली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ऑगस्टला दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार होती. महाआघाडीचे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांनी इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये तळ ठोकला होता. सकाळी निवडणुकीसाठी महापालिका भवनात महाआघाडीचे सदस्य दाखल झाले, तर शिवसेना भाजपचे सदस्यही एकापाठोपाठ एक आले. सभापतिपदासाठी प्रथम निवडणूक झाली. शिवसेनेच्या हर्षा बडगुजर भाजपच्या ज्योती गांगुर्डे यांनी माघार घेतल्यामुळे संजय चव्हाण यांची अविरोध निवड झाली. त्यानंतर उपसभापतिपदासाठी बडगुजर, गांगुर्डे यांच्याबराेबरच काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी माघार घेतल्यामुळे मनसेचे गणेश चव्हाण यांची अविरोध निवड झाली.
स्थगितीसाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न
दोन वेळा शिक्षण समितीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या संजय चव्हाण यांना भाजप सरकारने धक्का दिला होता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात नुवडणुकीला स्थगिती घेण्यासंदर्भात भाजप सरकारकडून हालचाल झाली. मात्र, न्याय व्यवस्थेने सरकारचा हेतू शुद्ध नसल्याचे लक्षात घेऊन कोणतीही सुनावणी करण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
‘रामायण’वर जल्लोष
शिक्षणमंडळ बरखास्त झाल्यानंतर नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीचे सभापती होण्यासाठी संजय चव्हाण यांनी चंग बांधला. एकीकडे मुख्यमंत्र्यांपासून तर अनेक भाजपचे दिग्गज पदाधिकाऱ्यांमध्ये शिक्षण समितीवरून रस्सीखेच सुरू झाल्यानंतर न्यायालयीन लढाई देत चव्हाण यांनी अखेरपर्यंत खुर्ची मिळवण्यासाठी संघर्ष केला. परिणामी, निवडणूक अविरोध पार पडल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीयांचे आभार मानत जोरदार जल्लोष सुरू केला. त्यांच्या कुटुंबीयांसमवेत ‘रामायण’ येथे ढाेल-ताशांच्या गजरात गुलाल उधळण्यात आला.
शिक्षण समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय चव्हाण उपसभापती गणेश चव्हाण यांचा सत्कार करताना महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा. समवेत नगरसेवक आदी.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी लक्ष
महापालिकाशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करण्यात येतील. निव्वळ विद्यार्थीच नाही, तर महापालिका शाळांतील शिक्षकांमधील गुणवत्ता वाढवून चांगली पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजयचव्हाण, सभापती, शिक्षण समिती
मराठीसह उच्च शिक्षण देणार
महापालिकाशाळांमध्ये मातृभाषा मराठीचे धडे देण्याबराेबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी स्पर्धा परीक्षांचे धडे दिले जातील. जेणेकरून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यास मदत होऊ शकेल.
गणेश चव्हाण, उपसभापती, शिक्षण समिती
बातम्या आणखी आहेत...