आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालतीची वाटचाल अाता लोकचळवळीकडे, 2 लाख प्रकरणे तडजाेडीसाठी ठेवण्यात येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित लोकअदालतीमध्ये विक्रमी दाेन लाख प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ही लोकअदालत अाता लोकचळवळ झाली असून नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेत ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नोव्हेंबरला होणारी लोकअदालत देशात अव्वल ठरण्याची शक्यता प्रधान जिल्हा सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल २७ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. राज्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालय अव्वल ठरले होते.

 

जिल्हा सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी (दि. ९) आयोजन करण्यात आले आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, विधा सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव एस. एम. बुक्के दोन महिन्यांपासून तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करत लोकअदालत लोकचळवळ होण्याकरीता अथक प्रयत्न करत आहेत. शिबिरांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. वर्षानुवर्षे न्यायालयात खटले प्रलंबित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनामध्ये नागरिकांकडून दंड भरुन खटले मागे घेतले जात असल्याचे न्यायमूर्ती शिंदे यांनी सांगितले.

 

लोकअदालत आता लोकचळवळ होत असल्याने नागरिकांकडून राष्ट्रहितासाठी जनजागृती होत आहे. शनिवारी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये दाेन लाख प्रकरण निपटाऱ्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फौजदारी, मोटरवाहन अपघात, कौटुंबिक वाद, दिवाणी, महानगरपालिका, ग्रामपंचायत या प्रकरणांचा समावेश आहे.

 

सर्वांच्या सहकार्याने चळवळ शक्य
शिबिरांमध्ये नागरिकांसह लोकप्रतिनिधींचा मिळालेला प्रतिसाद बघता लोकअदालतीची आता लोकचळ‌वळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. राष्ट्रहितासाठी काम करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेल्याे नियोजनाचे चांगले फळ मिळाले अाहे. नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे.
- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश, नाशिक

बातम्या आणखी आहेत...