आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र पौर्णिमेनिमित्त रेणुकामातेच्या चरणी हजारो भाविक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड- चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रेणुका देवीच्या चरणी दिवसभरात हजारो भाविक नतमस्तक झाले. यात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
 
श्री रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवात दिवस तर चैत्र पौर्णिमेला एक दिवसीय यात्रोत्सव असताे. मंगळवारी पहाटे वाजता नितीन चांदवडकर (नाशिक) जगन्नाथ सांगळे (मनमाड) यांच्या हस्ते मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. देवीचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात येऊन देवीला पैठणी परिधान करून आरती करण्यात आली. त्यानंतर रंगमहालात ठेवण्यात आलेली रेणुका देवीची आभूषणे सकाळी ८.३० वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीने मंदिरात नेण्यात येऊन ती विधिवत देवीच्या मूर्तीवर चढविण्यात आली.
 
 यानंतर भजन, पूजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यात्रोत्सवासाठी मंदिर व्यवस्थापक एम. के. पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी अहिरराव, प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी, हरिभाऊ कासव, नारायण कुमावत, काळू पवार, खंडू आहेर यांनी परिश्रम घेतले. 
बातम्या आणखी आहेत...