आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लाइव्ह रिपोर्टः हरदा रेल्वे अपघात, मृतांची संख्या २९ वर ८३ गाड्यांच्या मार्गात बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदा/होशंगाबाद- मध्य प्रदेशात हरदा-खिरकियादरम्यान काली माचक नदीच्या पुलावर कामायनी एक्स्प्रेसचे ११ आणि जनता एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. यामुळे मार्गावरून जाणाऱ्या ८३ गाड्यांच्या मार्गांत बदल, तर १९ गाड्या रद्द झाल्या आहेत. अपघात मंगळवारी रात्री सुमारे ११.१० वाजता घडला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. दोन्ही रुळांवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मंगळवारी रात्री हरदामध्ये प्रचंड पाऊस झाला. मांदला गावाला पुराने वेढले. गावाजवळून इटारसी-मुंबई रेल्वेमार्ग जातो. येथेच नदीवर छोटा पूल आहे. रुळाच्या दोन्ही बाजूंना पाणी तुंबलेले होते. त्यामुळे रुळाच्या पिचिंगमध्ये भेगा पडल्या. यामुळे मुंबई ते वाराणसी या कामायनी एक्स्प्रेसचे ११, तसेच जनता एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले. मृतांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. त्यात बहुतांश लोक मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरचे आहेत. पुलाच्या आधी असलेला अॅप्रोच जमिनीत धसल्याने दुर्घटना घडली.

अडीच तास जंगलातून प्रवास, पावसाने रोखली परतीची वाट
काशीयात्रेला निघालेले महाराष्ट्रातील मालेगाव येथील दीडशे भाविक मध्य प्रदेशात झालेल्या कामायनी एक्स्प्रेसला झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो, अशा शब्दात या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी दिव्य मराठीशी बोलताना अनुभव कथन केले.

मालेगाव- मध्यरात्री सव्वाअकराची वेळ... कोणी बर्थवर पहुडलेले, पेंगुळलेले, तर काहींचा नुकताच डोळा लागलेला... अचानक धडाड‌्धड् वाज आला आणि सारेच जागे झाले. अनेक जण बर्थवरून पडल्याने जखमी झाले. कोणी म्हणे ‘चालकाने अचानक ब्रेक दाबले, तर कोणी म्हणे डबाच तुटला..’ अशा नानाविध शंका-कुशंका सुरू झाल्या. काहीच समजेना. आम्ही दरवाजातून डोकावून पाहिले तर तिसऱ्या डब्यानंतर एकही बोगी नव्हती. सगळे खाली उतरलो, टॉर्चच्या प्रकाशात रेल्वे रुळालगत अंदाजे अडीच तास किर्र अंधारातून जंगलात चालत चालत गेलो. तांबडं फुटलं तेव्हा जिवात जिव ला...... मालेगावच्या प्रवासी संगीता पाटील यांनी ‘दिव्य मराठी’कडे आपबीती कथन केली.

मालेगाव व परिसरातील सुमारे दीडशे प्रवासी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मनमाडहून रेल्वेने काशीकडे निघाले होते. काशी - प्रयाग असा पाच दिवसांचा त्यांचा प्रवास होता. याच दरम्यान, कामायनी एक्स्प्रेसला मध्य प्रदेशात अपघात झाला. अपघाताच्यावेळचे अनुभव संगीता पाटील यांच्याच शब्दांत...‘मनमाडला रेल्वेत बसल्यावर गाणे, गप्पा सुरू झाल्या. सायंकाळी ६.३० वाजता सर्वांनी जेवण घेतले. नंतर भजने म्हटली. अकराच्या सुमारास अपघात झाला. पाच व सहा नंबरचे डबेच दिसेनात. त्यात आमचे सहप्रवासी होते. डबे अचानक निसटून पडत होते. आम्ही तिन्ही डब्यांतले लोक खाली उतरलो. सगळीकडे किर्र अंधार. सर्वांनी निर्णय घेतला, ता परत ‘हरदा’कडे परतायचे. रुळांच्या आधारे प्रवास सुरू केला. आम्ही शंभरेक प्रवासी होतो. टॉर्च सुरू केल्या. चांगले अडीच तास बॅगा व सामानाचे ओझे सांभाळत चालत राहिलो. सकाळी काही स्थानिक मदतीला धावले. त्यांच्या मदतीने भिरंगी रेल्वेस्टेशनला पोहोचला. तेथून स्थानिक लोकांनी ट्रॅक्टरने आम्हाला हरदाला (मध्य प्रदेश) पोहोचवलं. तेथे स्टेशनवर अनेक संस्थांनी अपघातग्रतांसाठी चहा, बिस्किटे, भाजीपोळी अशा खाद्यपदार्थांची व्यवस्था केली होती. एवढी भरभरून माणुसकी कुठे पाहिली नव्हती. दुपारी २ पर्यंत आम्ही तेथेच बसून होतो. अखेर मालेगावला परत जायचा निर्णय घेतला. दोन खासगी बस ठरवून इंदूरकडे प्रवास सुरू केला तर मुसळधार पाऊस सुरू झाला. चालकाला समोरील रस्ताही दिसेना. तेवढ्यात स्थानिक पोलिस युक्तआले. त्यांनी घाबरू नका, असा धीर दिला. पोलिसांच्या सल्ल्यानुसार दोन्ही बस परत फिरवल्या. पुन्हा हरदा गाठले. आता येथील गुजराथी धर्मशाळेत सगळे थांबलो होत. गुरुवारी पाऊस थांबला की तर मालेगावकडे निघू.
आधीच रेल्वे अपघातातून वाचल्याने आम्हाला बोनस युष्य मिळाले होते. त्यात असा मुसळधार पाऊस पाहून घबराट झाली.

३६ तास डोळ्याला डोळा नाही
रात्री अपघात झाला तेव्हा रुळांखाली पाणी होते. आमची बोगी अक्षरश: पाण्यावर तरंगत होती. अनेक लोक वाहून गेले. इतर बोगी सुखरूप होत्या. चार व सहा नंबरचे डबे दिसत नव्हते. सुदैवाने यात आमच्यापैकी कोणीही नव्हते. अस्ताव्यस्त पडलेल्या बॅगा, सामान पाहून काहीतरी भयानक घडले हे याचा अंदाज आला. नशीब बलवत्तर म्हणून म्ही बचावलो. त्यातच मुसळधार पावसामुळे इंदूरकडेही जात ले नाही. तब्बल ३६ तास डोळ्याला डोळा लागलेला नाही. आम्ही सगळेच नवा जन्म घेऊन परतत होत.
-अर्चना प्रवीण भामरे, प्रवासी व
सोयगावच्या रहिवासी

शंभरावर यात्रेकरू हरदाला मुक्कामी
मालेगावहून काशी - प्रयाग यात्रेला सुमारे शंभर प्रवासी गेले होते. अपघातानंतर ते सर्वजण बुधवारी हरदा (मध्य प्रदेश) येथे मुक्कामी हेत. अनेकांनी मोबाइलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधला. या प्रवाशांनी पुढचा प्रवास रद्द केला हे. १० ते १२ लोक जखमी झाले हेत. त्यांच्यावर येथे उपचार करण्यात आले हेते. मध्य प्रदेशातील पोलिस, रेल्वे प्रशासन व स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले होते. हरदा रेल्वेस्थानकावर या प्रवाशांच्या जेवणाची व श्रयाची व्यवस्था करण्यात आली होती.