आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीची परीक्षा 28 पासून, 10 वीची मार्चमध्ये, 25 मार्चपर्यंत बारावीचे पेपर सुरू राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेसाठी विभागात एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी प्रविष्ट राहणार अाहेत. तर, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दहावीसाठी दोन लाख १२ हजार विद्यार्थी प्रविष्ट राहणार आहेत. 
 
दहावी बारावीच्या परीक्षांच्यादृष्टीने शिक्षण मंडळातर्फे आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात अाली अाहे. बारावीच्या परीक्षेला २८ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, २५ मार्चपर्यंत परीक्षा होईल. तर, दहावीची परीक्षा मार्च ते एप्रिल २०१७ या कालावधीत होणार आहे. 
 
नाशिक जिल्ह्यात बारावीचे एकूूण ७४ हजार ७१९ परीक्षार्थी असून, यामध्ये विज्ञान शाखेचे २६ हजार १३, कला ३१ हजार २०१, वाणिज्यचे १४ हजार ५४६ तर एमसीव्हीसीचे हजार ९५९ इतके परीक्षार्थी अाहेत. 
 
नाशिक जिल्ह्यात शालांत परीक्षेसाठी अावेदनपत्र भरलेल्या शाळांची संख्या हजार ४५ इतकी असून, एकूण परीक्षा केंद १८८ अाहेत तर प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या ९६ हजार ७३० इतकी अाहे. मंडळाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली अाहे. 
 
विद्यार्थी, पालकांसाठी मदतवाहिनी 
शिक्षणमंडळातर्फे परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, परीक्षा कालावधीत विद्यार्थी पालकांसह शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विभागीय मंडळाने मदतवाहिनी कार्यान्वित केली आहे. त्यासाठी ०२५३-२५९२१४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना ताणतणावांचे व्यवस्थापन समस्यांचे शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळातर्फे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून, त्यासाठी नाशिकसाठी बावा किरण रामगीर (९४२३१८४१४१) मार्गदर्शन करतील. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...