आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतेरा हजार वीजमीटर नाशिक परिमंडळात सदाेष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कागदावर अत्याधुनिकतेचा आव आणणाऱ्या महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात बदललेले रोलेक्स कंपनी चे साडेतेरा हजार वीजमीटर सदाेष निघाले. महावितरणच्या चुकीमुळे वीज ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महिन्याकाठी पाचशे रुपये वीजबील येणाऱ्या ग्राहकांना सध्या हजार ते ४२ हजार रुपयांपर्यंत वीजबील येत असल्याने महावितरणकडून फसवणूक हाेत असल्याचा अाराेप ग्राहकांकडून हाेत अाहे. 
 
नाशिक परिमंडळात गत वर्षभरात लाख ४२ हजार ७७० वीजमीटर बदलण्यात आले. यामध्ये सिंगल फेज लाख ३२ हजार ९००, थ्री पेज मीटर हजार ८७० अशी संख्या आहे. तर दोन वर्षापासून टप्प्याटप्प्याने रोलेक्स कंपनीचे जवळपास एक लाख २० हजार मीटर परिमंडळात आले असून त्यापैकी ६० हजार मीटर ठिकठिकाणच्या ग्राहकांकडे बसविले. यात ग्राहकांचा वीज वापर आणि मीटरवरील रिडींग यांच्यात ताळमेळ बसत नसल्याचे आढळले. रोलेक्स कंपनीच्या बसविलेल्या मीटरपैकी साडेतेरा हजार मीटर हे सदाेष असल्याचे महावितरणच्या तपासणीत आढळले. त्यामुळे महावितरणने हे मीटर बसविणे बंद केले मीटर बदलण्याचे काम हाती घेतले.
 
महावितरणने आतापर्यंत सदाेष आढळलेल्यांपैकी नऊ हजार मीटर बदलले आहेत. मात्र, या दरम्यान महावितरणने रोलेक्स कंपनीला दिलेल्या ठेक्यामुळे आणि महावितरणने मीटरचे पैसेही ग्राहकांकडून वसुल केले. मीटरचे पैसे आणि सदाेष मीटर यामुळे आलेले अतिरिक्त वीजबील याचा आर्थिक फटका वीजग्राहकांना बसला आहे. अतिरिक्त वीजबील आल्यानंतर महावितरण कर्मचारी ग्राहकांना प्रथम बिलाची रक्कम भरण्यास सांगतात. त्यानंतर ते कमी करुन दिले जाईल, असे उद्धट भाषेत सांगतात. मात्र तोपर्यंत ग्राहकांना वीज कपात होऊ नये या भीतीने बीलाची रक्कम अदा करावी लागत आहे. विशेष म्हणजे महावितरणचे कर्मचारी मीटर तपासणी करण्याचा सल्लाही देतात. या तपासणीसाठी वीज ग्राहकांना दीडशे ते पावणे दोनशे रुपयांपर्यंत खर्च येतो. 

व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार 
^राज्यात सुमारे अडीच ते तीन लाख वीजमीटर सदाेष असल्याचे समोर येत आहे. याबाबत व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे याबाबत तक्रारही करण्यात अाली अाहे. मात्र त्यामध्ये अद्यापही सुधारणा झालेली नाही. -अॅड. सिद्धार्थ साेनी, सचिव, राज्य वीज ग्राहक समिती 

डीपी आणि प्रत्यक्ष मीटरची करावी तपासणी 
एखाद्या सोसायटीमध्ये वीज ग्राहकांना अतिरिक्त बील आल्याची तक्रार आल्यास महावितरणने संबधीत सोसायटीला दिलेल्या डीपीतून वितरीत होणाऱ्या वीजेची युनिट आणि सोसायटीतील मीटरचे युनिट यांची तपासणी करावी. यामध्ये तफावत आढळल्यास त्याची जबाबदारी ही महावितरणची असते. 

जागेवरच करा मीटरची तपासणी 
महावितरणने प्रत्येक ग्राहकाला नवीन मीटर देतांना तपासणी करण्याची गरज आहे. यामध्ये दोन पध्दती असून एक जागेवर तपासणी आणि दुसरी लॅबमधील तपासणी. या दोन्ही तपासणी महावितरणने माेफत करण्याची गरज आहे. परंतु महावितरण याचा आर्थिक खर्च वीज ग्राहकांच्या माथी मारत असल्याने ग्राहकांना सुविधांपेक्षा तणावच अधिक मिळत आहे. 
बातम्या आणखी आहेत...