आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे उद्याेग येण्यासाठी ‘मेक इन’ ठरणार उपयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-ठाण्यानंतर अाैद्याेगिक विकासाच्या खूप क्षमता नाशिकमध्ये अाहेत, ‘मेक इन नाशिक’ च्या माध्यमातून त्यांचे सादरीकरण देशातील उदयाेगांपुढे केले जाणार अाहे. नाशिकच्या ब्रंॅडींगकरता हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार अाहे. माेठे उद्याेगधंदे शहरात येतील, अशी अपेक्षा या उपक्रमाचे संयाेजक अाणि राज्याचे जलसंपदा वैद्यकिय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली अाहे. ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमासाठी सरकारी पातळीवर पुढाकार घेवून हा उपक्रम पुढे नेण्याकरीता महाजन यांची भूमिका महत्त्वाची असल्याने याच अनुषंगाने त्यांच्याशी केलेली ही बातचित ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी.... 
 
{ मेक इन नाशिकमध्ये शासनानेही सहभाग घेतला अाहे, त्याचा फायदा कसा हाेईल? 
-नक्की, फायदा हाेणार अाहे. डिसेंबर महिन्यात एका कार्यक्रमात मी निमा हाऊस येथे गेलाे असता तीथे असा उपक्रम करणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले पालकमंत्री म्हणून मलाही त्यात सहयाेग देण्याची विनंती केली, मी तत्काळ ह्या मागणीला पाठिंबा दिला अाणि अाज शासनस्तरावरून सर्वप्रकारची मदत अाम्ही अायाेजनासाठी उपलब्ध करुन देत अाहाेत. नाशिकमध्ये उद्याेगवाढीला माेठी संधी अाहे अाणि ती या उपक्रमातून साध्य हाेवू शकते,ज्यातून माेठ्या प्रमाणावर राेजगारही निर्माण हाेईल याचा िवचार करून शासनाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला अाहे. 

{नाशिकमध्ये कुठल्या प्रकारचे उद्याेग यावेत यासाठी तुमचे प्रयत्न सुरू अाहेत? 
-नाशिकमध्ये उद्याेग सुरू करण्यासाठीच्या खूप क्षमता अाहेत. या शहराचे भाैगाेलिक स्थानही राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने ते सहज शक्यही अाहे. येथे द्राक्ष, कांदा, डाळींब, टाेमॅटाे, भाजीपाला अशी पिके माेठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र खूप उत्पादन अाल्यावर या उत्पादनाचे भाव पडतात, यातून शेतकऱ्यांना िदलासा मिळावा यासाठी कृषी मालावर अाधारीत प्रक्रिया उद्याेग येथे माेठ्या प्रमाणावर सुरू हाेवू शकतात. शेतकऱ्यांच्या पिकांना त्यामुळे चांगला दाम मिळू शकताे, हे लक्षात घेवून त्यावर काम सुरू अाहे. अाज अनेक तरूण नाशिक साेडून बाहेरगावी नाेकरीसाठी जात अाहेत, यात अायटीयन्सचीही संख्या माेठी अाहे. त्यामुळे अायटी उद्याेगांसाठी नाशिकला चांगले वातावरण असल्याचे चित्रही या उपक्रमातून सादर हाेईल ज्याचा फायदा ह्याप्रकारचे उद्याेग येथे यावेत यासाठी शासन प्रयत्न करेल. 

{या दृष्टीने कुठल्या प्रकारचे उद्याेगअाणण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत? 
-याेगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्याेगाने येथे यापूर्वीच चाचपणी केली अाहे. अाम्ही त्यांना या उपक्रमाचे निमंत्रणही िदले अाहे, येथे उद्याेग सुरू व्हावा यासाठी पाठपूरावाही सुरू अाहे. पतंजलीसह इतर कृषी प्रक्रिया उद्याेगांनाही अामंत्रित करण्यात अाले अाहे, त्यांनी येथे उद्याेग सुरू करावेत यासाठी अामचे प्रयत्न अाहेत. 

{ह्या प्रयत्नांचे रुपांतर म्हणून ‘मेक इन नाशिक’मध्ये काही सामंजस्य करार हाेतील? 
-नक्कीच हाेतील, अाम्हाला खूप अपेक्षा अाहेत. हा उपक्रम ही एक सुरुवात असेल यातून शहराचे ब्रंॅडींग झाल्यामुळे माेठे उदयाेग, अायटी उद्याेगांची गुंतवणूक करतांना उद्याेजकांकडून नाशिकचा पर्याय तपासला जाईल, ज्यातून एक निरंतर प्रक्रिया म्हणून गुंतवणूकीचा अाेघ सुरू हाेईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...