आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३९ उद्याेगांचे १८६९ काेटींचे गुंतवणूक प्रस्ताव शासनाकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमातून ३९ उद्याेगांनी ‘निमा’कडे (नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन) सादर केलेले १८६९ काेटी रुपयांच्या अाैद्याेगिक गुंतवणुकीचे प्रस्ताव अाता ‘निमा’ने एमअायडीसी अाणि जिल्हा उद्याेग केंद्राकडे सुपूर्द केले अाहेत. विशेेष म्हणजे, प्रस्ताव देणाऱ्या उद्याेजकांना एमअायडीसीच्या अाॅनलाइन संकेतस्थळावर अपेक्षित जागेसाठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात अाला असून, अशा उद्याेजकांना भूखंड वितरणात प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती ‘निमा’च्या सूत्रांनी दिली. 
 
नाशिकमध्ये अाैद्याेगिक गुंतवणूक येण्यासाठी ‘निमा’ने मुंबईमध्ये मे महिन्यात ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे अायाेजन केले हाेते. या उपक्रमाचे फलित म्हणून ३९ उद्याेगांनी हे प्रस्ताव निमाकडे सादर केले हाेते. या प्रस्तावांतून नाशिकसह दिंडाेरी अाणि सिन्नर अाैद्याेगिक वसाहतींतून नव्या उद्याेगांची उभारणी किंवा उद्याेग विस्तार करण्यासाठी किमान अडीचशे एकर जागेची मागणी करण्यात अाल्याचे ‘निमा’च्या सूत्रांनी सांगितले. हे प्रस्ताव सादर झाल्यानंतर शासन अभ्यास करून उद्याेगांना जमीन देणार असल्याचे यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अाहे. मात्र, अाता या उद्याेजकांनाही सामान्यांप्रमाणेच अाॅनलाइन अर्ज सादर करावे लागतील, असे सांगण्यात अाले अाहे. यामुळे शासनस्तरावरून ‘मेक इन नाशिक’ला कसा प्रतिसाद मिळताे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे. 

शासनाकडून चांगल्या प्रतिसादाची अाशा 
^‘मेकइन नाशिक’च्या माध्यमातून ‘निमा’कडे अालेल्या ३९ उद्याेगांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव अाम्ही एमअायडीसी अाणि जिल्हा उद्याेग केंद्राकडे सादर केले अाहेत. शासनाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची अाम्हाला अाशा अाहे. -अाशिष नहार, चेअरमन, गुंतवणूक समिती, मेक इन नाशिक 
बातम्या आणखी आहेत...