आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- मेक इन नाशिकसाठी माेठ्या उद्याेगांची गुंतवणुकीसाठी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री गिरीश महाजन अाणि उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित लाेकप्रतिनिधी निमाचे पदाधिकारी. - Divya Marathi
पालकमंत्री गिरीश महाजन अाणि उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित लाेकप्रतिनिधी निमाचे पदाधिकारी.
नाशिक- अन्न प्रक्रिया उद्याेग, डिफेन्स क्लस्टर उभारण्यासह ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये ज्या उद्याेगांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीकरिता सामंजस्य करार केले अाहेत. अशा उद्याेगांना ‘मेक इन नाशिक’करिता अामंत्रित करून नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी विनंती केली जाणार अाहे. या उद्याेगांना राज्य सरकारकडून या उपक्रमाकरिता अामंत्रित केले जाणार असून अाठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अाढावा बैठक घेण्यात येणार अाहे. अन्नप्रक्रिया उद्याेगांचे हब तसेच डिफेन्स क्लस्टर नाशिकमध्ये उभे रहावे यासाठी या उत्पादनांशी संबंधित उद्याेगांनाही ‘मेक इन नाशिक’करिता निमंत्रित करण्याचा निर्णय मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत लाेकप्रतिनिधी, निमासह अाैद्याेगिक संघटनांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. 
 
डिफेन्स क्लस्टरसह उद्याेगांच्या गुंतवणूकीसाठी प्रयत्न 
नाशिकमध्ये माेठ्या उद्याेगांनी गुंतवणूक करावी यासाठी अापण प्रयत्न करणार असून जिंदाल, ब्रिटानिया यांसारख्या उद्याेगांशी स्वत: संपर्क साधणार असून पतंजली उद्याेग समुहाचे बाबा रामदेव यांना अापण स्वत: जावून निमंत्रण देणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. तर एमअायडीसीकडे उपलब्ध असलेली जागा, सध्या असलेल्या उद्याेगांना देण्यात येत असलेल्या सुविधा यांची माहीती एमअायडीसीच्या स्टाॅलव्दारे येथे दिली जाईल असे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मेक इन महाराष्ट्र या उपक्रमात सहभागी हाेत ज्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली अाहे, त्यांच्या यादीचा अभ्यास करून त्यांना मेक इन नाशिक उपक्रमाकरीता निमंत्रित केले जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. 
 
यांचा हाेता बैठकीत सहभाग 
मुंबईतील वरळीच्या नेहरू सेंटर येथे ३० व ३१ मे राेजी ‘मेक इन नाशिक’उपक्रम हाेईल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार याच्या तयारीने वेग घेतला अाहे. मंगळवारची बैठक ही त्याचाच भाग हाेती. या बैठकीला अामदार देवयानी फरांदे, अामदार बाळासाहेब सानप, अामदार हेमंत टकले, महापाैर रंजना भानसी, उपमहापाैर प्रथमेश गिते,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, गटनेते संभाजी माेरूस्कर, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणीस डाॅ.उदय खराेटे, अतिरिक्त उपाध्यक्ष अाशिष नहार, सचिव ज्ञानेश्वर गाेपाळे, नितीन वाघस्कर, भाजप उद्याेग अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, सुरेश माळी, एमअायडीसीच्या हेमांगी पाटील यांची उपस्थिती हाेती. 
 
रेल्वे प्रकल्प-कागद कारखान्यासाठी पाठपुरावा करणार 
नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या अनुषंगाने कागद कारखाना तसेच रेल्वेशी संबंधित उद्याेग नाशिकला उभारण्याची मागणी अाहे, जागा इतर सुविधाही तयार अाहेत, यासह डिफेन्स क्लस्टर नाशिकमध्ये साकारावे, अशी मागणी उपस्थित उद्याेजकांनी केली. यावर अापण स्वत: केंद्र सरकारकडे तातडीने या प्रकल्पांकरिता पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...