आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन नाशिक’साठी पुढील सप्ताहात उद्याेगमंत्र्यांकडे बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  नाशिकमध्ये अाैद्याेगिक गुंतवणूक व्हावा, या उद्देशाने मुंबईत पुढील महिन्यात हाेवू घातलेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाकरीता मे राेजी उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात विशेष बैठक हाेत अाहे. या बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन यांसह विविध खात्यांचे अधिकारी, लाेकप्रतिनिधी यांना अामंत्रित करण्यात अाले अाहे. एकूणच ‘मेक इन नाशिक’च्या उपक्रमाकरीता अाता सरकारी पातळीवरही गती अाली असून यापूर्वीही पालकमंत्री उद्याेगमंत्र्यांनी एक बैठक घेतली हाेती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील अपेक्षित हाेती, मात्र अाता उद्याेगमंत्रीच ही बैठक घेणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे. 
 
नाशिकमध्ये गेल्या साेळा वर्षात एकही माेठा उद्याेग अाला नाही, काही उद्याेगांनी विस्तार जरूर केला अाहे. मात्र दरवर्षी शिक्षण पूर्ण करून राेजगारासाठी उपलब्ध हाेत असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या संख्येच्या तुलनेत अपेक्षित राेजगारनिर्मिती झालेली नाही. हाच विचार गांभीर्याने घेत नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनकडून ‘मेक इन नाशिक’चा उपक्रम मुंबईत घेतला जात अाहे. मोठ्या काॅर्पाेरेट समुहांसह विविध देशांच्या दूतावासांनाही अामंत्रित करण्यात येत अाहे. पालकमंत्री गिरीश महाजन स्वत समन्वयकाची भूमिका पार पाडत असल्याने राज्य शासनाकडूनही या उपक्रमाला चालना मिळत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...