आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था : तब्बल 110 नगरसेवक, 17 अामदारांची ‘मेक इन नाशिक’च्या बैठकीला दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये नवीन अाैद्याेगिक गुंतवणूक यावी, येथील राेजगार वाढावा, स्थानिक उद्याेगांचा व्यवसाय वाढावा जेणेकरून शहर विकासाला चालना मिळावी या उद्देशाने माेठा गाजावाजा करून हाती घेण्यात अालेल्या ‘मेक इन नाशिक’ची काळजी १९ पैकी फक्त अामदार अाणि १२२ पैकी केवळ १२ नगरसेवकांनाच असल्याची बाब या संदर्भातील बैठकांना लाेकप्रतिनिधींनी लावलेल्या उपस्थितीतून पुढे अाली अाहे. उर्वरीत १७ अामदार ११० नगरसेवकांनी मात्र या उपक्रमासाठी हाेणाऱ्या पूर्वतयारीच्या बैठकांना दांडी मारत शहर विकासाबाबतची अापली ‘अास्था’ ‘तळमळ’ दर्शवून दिली अाहे.
 
गेल्या पंधरा ते वीस वर्षात नाशिकमध्ये एकाही माेठया उद्याेगाने गुंतवणूक केलेली नाही, दुसरीकडे कुशल मनुष्यबळ मुबलक उपलब्ध असतांनाही हाताला काम िमळत नाही म्हणून स्थानिक तरूण पुणे-बंगलाेर सारख्या शहरांत स्थलांतरीत हाेत अाहेत. बेराेजगारांची संख्या वाढत अाहे. म्हणूनच उद्याेजकांची संघटना असलेल्या निमाने मुंबईत ‘मेक इन नाशिक’ हा महत्वकांक्षी उपक्रम घेवून त्यात नाशिकचे सादरीकरण करायचे नवी अाैद्याेगिक गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. 
 
येत्या ३० अाणि ३१ मे राेजी वरीळीच्या नेहरू सेंटरमध्ये हा उपक्रम हाेत असून पालकमंत्री गिरीश महाजन या उपक्रमाचे निमंत्रक अाहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी याकरीता बैठका घेवून शासनही पाठीशी असल्याची ग्वाही दिली अाहे. सध्या हा उपक्रम अंतीम टप्प्यात असल्याने राजकिय पाठबळ मिळावे याकरीता निमाकडून अाता लाेकप्रतिनिधींच्या बैठका घेतल्या जात अाहेत. मात्र साेमवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीस महापालिकेतील १२२ पैकी अवघे १२ नगरसेवक उपस्थित हाेते. तर मंगळवारी झालेल्या अामदारांच्या बैठकीला जिल्ह्यातील एकुण १९ पैकी देवयानी फरांदे अाणि डाॅ.सुधीर तांबे हे दाेनच अामदार उपस्थित हाेते. बाकिच्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने संबंधित लाेकप्रतिनिधींना एवढ्या महत्वकांक्षी उपक्रमाशी काहीही देणंघेणं नसल्याची चर्चा संबंधित वर्तुळात रंगली हाेती. 

लग्नांना प्राधान्य 
विकासासाठी दत्तक म्हणून नाशिकचा स्वीकार केलेले मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री ‘मेक इन नाशिक’साठी वेळ काढतात, मात्र स्थानिक लाेकप्रतिनिधींना त्याहूनही लग्नसमारंभांतील हजेरी अन्य फुटकळ कामे अधिक महत्वाची असल्याचे पुढे अाले अाहे. यासंदर्भात साेमवारी नगरसेवकांसाठी अायाेजित बैठकीत बाेलताना महापाैर रंजना भानसी यांनी बहुसंख्य नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे अप्रत्यक्ष समर्थनच केले. नगरसेवकांची धावपळ असते असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मात्र सर्व नगरसेवक उपस्थित राहतील असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. मंगळवारच्या लाेकप्रतिनिधींच्या बैठकीसही अामदार फरांदे डाॅ. सुधीर तांबे हेच उपस्थित हाेते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...