आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिफेन्स क्लस्टर, मेगा फूड पार्क नव्या उद्याेगाची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबईत निमाच्या वतीने ३० ३१ मे राेजी हाेणाऱ्या ‘मेक इन नाशिक’मध्ये बहुचर्चित डिफेन्स क्लस्टर अाणि मेगा फूड पार्कसह नवे उद्याेग नाशिकला मिळण्याची घाेषणा हाेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. नाशिकमध्ये नवी अाैद्याेगिक गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार अाहे. 
 
निमासारख्या उद्याेजकांच्या एका अाैद्याेगिक संघटनेकडून नाशिक िजल्ह्यातील अाैद्याेगिक गुंतवणुकीच्या क्षमता, देशातील ‘टाॅप २००’ कंपन्यांसमाेर सादर करण्यासाठी अायाेजित केलेला अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम अाहे, ज्याला राज्य शासनही हातभार लावत अाहे. 

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या उपक्रमाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपक्रमाला उपस्थित राहणार अाहेत. 
उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनीही या उपक्रमासंदर्भात तीन बैठका घेतल्या असल्याने माेठ्या घाेषणेची अपेक्षा उद्याेगजगतासह शहरवासीयांकडून केली जात अाहे. नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यासंदर्भातील प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. 
या उपक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते सुरेश प्रभू यांनाही निमंत्रित करण्यात अाले असून त्यांच्याकडून एखाद्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासाठी नाशिकचा विचार हाेताे का, याचीही उत्सुकता अाहे. एकूणच, एक दिवसावर अालेल्या या उपक्रमातून नाशिकला नक्की काय िमळते, किती गुंतवणूक येते अाणि नाशिकला अाैद्याेगिक गुंतवणुकीबाबत सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना बदलण्याची संधी राज्य सरकार साधते का, याकडे नाशिककरांचे डाेळे लागून अाहेत. 

या प्रकल्पांच्या घाेषणेकडे लक्ष 
{कर्षण मशिन वर्क्स येथे रेल्वेची चाके किंवा इंजिन बांधणीचा प्रकल्प 
{ करन्सी नाेटप्रेसच्या अनुषंगाने नाेटांच्या कागद निर्मितीचा कारखाना 
{ संरक्षण साहित्य निर्मिती हबची ( डिफेन्स क्लस्टर) उभारणी 
 
बातम्या आणखी आहेत...