आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी काँग्रेसला सर्वाधिक जागा, भाजप अन‌् एमअायएमचाही प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - महापालिकेच्या चाैथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८३ जागांसाठी बुधवारी (दि. २४) घेण्यात आलेल्या मतदानानंतर शुक्रवारी (दि. २६) सात ठिकाणी मतमाेजणी करण्यात अाली. प्रमुख दावेदार पाच पक्षांपैकी काेणालाही बहुमताइतक्या जागा मिळवता अाल्या नाहीत. त्यामुळे सभागृहाची स्थिती त्रिशंकू झाली अाहे. विद्यमान महापाैर हाजी माेहंमद इब्राहिम पराभूत झाले अाहेत. भाजप एमअायएमने दमदारपणे सभागृहात प्रवेश केला अाहे. सर्वाधिक २८ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी अाहे. 
 
गेल्या महिनाभरापासून राजकीय पक्षांनी चालवलेली तयारी शहरवासीयांमध्ये असलेल्या उत्कंठेचा शुक्रवारी मतमाेजणीनंतर जाहीर निकालानंतर शेवट झाला अाहे. शहरातील जाखाेट्या भवन, तालुका क्रीडा संकुल, शिवाजी जिमखाना माेतीबाग नाका या भागातील कृष्णा लाॅन्स या ठिकाणी सात निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमाेजणी करण्यात अाली. ८३ जागांसाठी ३७३ उमेदवार मैदानात हाेते. सकाळी १० वाजता मतमाेजणीला सुरुवात झाली. याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मतमाेजणी केंद्रांवर गर्दी करून हाेते. मतमाेजणी केंद्रांभाेवती स्थानिक पाेलिस राज्य राखीव पाेलिस दलाचा बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता. त्यामुळे ज्या प्रतिनिधींकडे निवडणूक शाखेचे अाेळखपत्र हाेते, त्यांनाच अात साेडण्यात येत हाेते. सकाळी ११ पासून निकाल हाती येण्यास प्रारंभ झाला. दुपारी वाजेपर्यंत सर्व निकाल घाेषित झाले. येथील अाैद्याेेगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फटाके गुलाल अाधीच अाणून ठेवला हाेता. ज्या दाेन उमेदवारांच्या मतांमध्ये दाेन अाकडी संख्येचे अंतर हाेते, त्या जागा उत्कंठा वाढविणाऱ्या ठरल्या. निवडणूक अधिकारी तथा मतमाेजणी केंद्राध्यक्ष यांच्याकडून विजयी उमेदवारांची नावे घाेषित हाेण्यापूर्वीच उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदान यंत्रनिहाय अाकडे संकलित झाल्याने केंद्रांबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लाेष पहायला मिळत हाेता. 

महापौरांचा दारुण पराभव 
विद्यमान महापाैर हाजी माेहंमद इब्राहिम माजी महापाैर तथा एमअायएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक इसा यांना पराभवाला सामाेरे जावे लागले. महापाैर हाजी माेहंमद इब्राहिम हे प्रभाग १३ मधून उमेदवारी करत हाेते. त्यांना काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते फारुक खान सैदुल्ला खान यांनी ६०० मतांनी पराभूत केले. तर माजी महापाैर अब्दुल मलिक शेख हे प्रभाग १७ प्रभाग २१ अशा दाेन्ही जागांवरून पराभूत झाले. त्यांना माजी अामदार शेख रशिद डाॅ. शफिक निसार अहमद यांनी पराभूत केले. 

कॅम्प रस्त्यावर जल्लाेष 
कॅम्पराेडवरील अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्था इमारतीत हिंदूबहुल भागातील प्रभागांची शुक्रवारी (दि. २६) मतमाेजणी हाेणार हाेती. त्यामुळे जसजसे निकाल घाेषित हाेत गेले, तसतसे सेना अाणि भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लाेष केला. त्यामुळे कॅम्पराेड पूर्णत: गुलालमय झालेला दिसून अाला. 

 
बातम्या आणखी आहेत...