आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून 54 मुस्लिमांना उमेदवारी, मालेगाव मनपा निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - महापालिकेच्या चाैथ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने शहराच्या पूर्व भागातून ५४ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली अाहे. मावळत्या सभागृहात एकही नगरसेवक नसताना यंदा स्वबळावर सर्वाधिक ७७ जागा लढविणाऱ्या भाजपने मुस्लिम मतांवर डाेळा ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससमाेर अाव्हान उभे केले अाहे. 
 
मालेगाव महापालिकेच्या २१ प्रभागांमधून ८४ उमेदवार निवडून जाणार अाहे. यातील प्रभाग हिंदूबहुल तर उर्वरित १६ प्रभाग हे मुस्लिम पट्ट्यात माेडतात. शहरात घडलेल्या दंगली, बाॅम्बस्फाेट यामुळे जातीय ध्रृवीकरण माेठ्या प्रमाणावर झाले अाहे. नदी के इस पार अाैर नदी के उस पार असे पूर्व पश्चिम भाग पडले अाहेत. शहराच्या पश्चिम पट्ट्यातील हिंदूबहुल पाच प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून जाणार अाहेत. तर बहुसंख्य मुस्लिम असलेल्या पूर्व भागातील १६ प्रभागांतून ६४ नगरसेवक निवडले जाणार अाहेत. मुस्लिम मते ही अापल्या हक्काची असल्याचे समजून काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, सपाने या मतांच्या बळावर निवडणूका लढविल्या अाहेत. यंदाच्या निवडणुकीतही हे पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरले अाहेत. परंतु, सध्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा झंझावात सुरू अाहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी मुस्लिम मते पदरात पाडण्यात यश मिळविले. 
 
भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक हाेती. काँग्रेस, राष्ट्रवादी एमअायएमकडून संधी मिळालेल्या नाराजांना भाजपने गळाला लावले अाहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने ७५ जागांवर अापले उमेदवार उभे केले अाहेत. तर अन्य ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला अाहे. राष्ट्रवादी जनता दल अाघाडीने ६४ उमेदवार दिले अाहे. काेणत्याही पक्षाला सर्व ८४ जागांवर उमेदवार मिळालेले नाही. तरीही भाजपने पहिल्यांदा सर्वाधिक ७७ जागा स्वबळावर लढविण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...