आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- मालेगावी मुस्लिम पंचायत सदस्यावर अॅसिड हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसिड हल्ल्यात चेहरा भाजलेले माेहंमद रमजान छाेटे सरदार - Divya Marathi
अॅसिड हल्ल्यात चेहरा भाजलेले माेहंमद रमजान छाेटे सरदार
मालेगाव- शहरातील६० फुटी राेडवर मंगळवारी रात्री मुस्लिम पंचायतीचे सदस्य माेहंमद रमजान छाेटे सरदार यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला केला. यात माेहंमद रमजान गंभीर भाजले असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात अाले अाहे. पंचायतीने विराेधात निकाल दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला अाहे. 
 
काैटुंबिक वादासह अन्य प्रकारच्या तक्रारी शरियत कायद्यानुसार मुस्लिम पंचायतीच्या माध्यमातून साेडविण्याचे काम माेहंमद रमजान करत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली अाहे. त्यांनी अाजपर्यंत अनेक प्रकारणे सामंजस्याने साेडविली अाहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ते ६० फुटी रस्त्याने पायी जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर पाठीमागून अॅसिड फेकले. अॅसिडने अंगावरील कपडे पेटल्याने माेहंमद रमजान यांनी अारडाअाेरडा केला. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात अाल्याने हल्लेखाेर अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. हल्ल्यात पाठीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून चेहरा तसेच हातही अॅसिड पडल्याने भाजला अाहे. नागरिकांनी माेहंमद रमजान यांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे पाठविण्यात अाले. घटनेची माहिती मिळताच उपअधिक्त्यांची प्रकृती स्थिर असून संशयितांच्या शाेधासाठी पथके रवाना करण्यात अाली अाहे. 
 
फाॅरेन्सिक लॅबची मदत 
हल्लेखाेरांच्या शाेधासाठी फाॅरेन्सिक लॅब पथकाची मदत घेतली जात अाहे. बुधवारी लॅब पथकाने घटनास्थळी पाहणी करून मातीवर अॅसिड पडल्याची शक्यता गृहित धरून तेथील नमुने तपासणीसाठी घेतले. हल्लेखाेरांनी कुठल्या अॅसिडचा वापर केला, ते कुठून मिळविले या सर्व प्रश्नांची उत्तरे शाेधण्याची प्रक्रिया अाता सुरू झाली अाहे. 
 
हल्लेखाेरांना अटक करू 
-अॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेतली अाहे. फाॅरेन्सिक लॅबची मदत घेऊन तपास सुरू अाहे. पार्श्वभूमी तपासण्यासाठी सर्व शक्यतांची पडताळणी केली जात अाहे. हल्लेखाेरांना लवकरच अटक केली जाईल. -गजानन राजमाने, पाेलिस उपअधीक्षक 
 
कामाची हाेणार चाैकशी 
रमजान हे कुठल्या पंचायतीचे काम करतात याची चाैकशी केली जाणार अाहे. पूर्व भागातील जनतेवर शरियतचा जबरदस्त पगडा असल्याने वादावादीची ९० टक्के प्रकरणे अशा पंचायतीमध्ये मिटविली जातात. त्यामुळे गुन्हे दाखल हाेण्याचे प्रमाण कमी असल्याने शहर हद्दीत वर्षभरात केवळ ४०० गुन्हे दाखल अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...