आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांनी अातापर्यंत फस्त केले 2 हजार टन आंबे, दरात घट होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - पिवळाधम्मक आणि आपल्या सुगंधाने तोंडाला पाणी आणणारा आंबा सध्या बाजारात जिकडेतिकडे दिसत आहे. त्यामुळे केवळ फळबाजारातच नव्हे तर गल्लोगल्ली डोक्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे सर्वत्र हापूस आणि केसर आंब्याचा सुगंध दरवळत आहे. या हंगामात आतापर्यंत नाशिककरांनी सुमारे हजार टनापेक्षा अधिक आंबा फस्त केला आहे. अक्षयतृतीयेला त्याच प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज आहे. 
 
नाशिक शहरात सध्या धरमपूर, रत्नागिरी, देवगड तसेच दक्षिण भारत आणि स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० क्विंटल आंब्याची आवक होत आहे. त्याव्यतिरिक्तही आंबा बाजारात दाखल होत आहे. यामध्ये हापूस, केसर, लालबाग, बदाम, पायरी, तोतापुरी या आंब्याचा समावेश आहे. नाशिकरोड, भद्रकाळी, सातपूर, सिडको, काॅलेजराेड या ठिकाणी आंबा विक्रीची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे शहरवासियांनाही जिकडेतिकडे आंबा दिसत असल्याने साहजिकच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. यावर्षी आंब्याचे अधिक उत्पादन असल्याने दरातही घसरण झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकही आंब्याची चव चाखत आहे. 
 
दरात घट होण्याची शक्यता 
- यावर्षी आंब्याची आवक अधिक असून प्रतिदिन ६०० ते ७०० क्विंटल आंबा बाजारात दाखल होत आहे. आंब्याची आवकही वाढणार असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे
-मनोज झाडे, फळ विभागप्रमुख, नाशिक बाजार समिती 
 
आंबा आवक जास्त 
- आंबा आवक जास्त असल्याने गतवर्षीपेक्षा दर कमी आहे. त्यामुळे ग्राहकांकडून आंब्याची अधिक मागणी होत आहे. अक्षयतृतीयेनंतर दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
-अय्याज शेख, आंबाविक्रेते 
 
- ग्राहकांकडून हापूस आणि केसर आंब्याला अधिक पसंती आहे. त्यामुळे आम्हीही ग्राहकांचा विश्वासघात होऊ नये यासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा विक्रीला प्राधान्य देतो
-मुजफ्फर सय्यद, आंबाविक्रेते 
 
- हापूस आणि केसर आंबा रसासाठी चांगला असल्याने तोच खरेदी केला. मात्र रासायनिकपेक्षा नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा खरेदीसाठी पसंती देतो.
-बाळासाहेब नेहे, ग्राहक 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अंब्याचे होलसेल आणि घाऊक दर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...