आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूखचा ‘मन्नत’ पाहण्यासाठी एका कुटुंबातील सहा मुली मुंबईत, अाधी सप्तशृंगीदेवीचे दर्शन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - पंचवटीतील एकत्रित कुटुंबातल्या एक-दाेन नव्हे तर सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने म्हसरूळ पाेलिसांची धावपळ उडते... वय केवळ १२ ते १५ वर्षे असल्याने वरिष्ठही या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्काळ सर्वत्र नाकाबंदी करून वायरलेसद्वारे सर्वत्र संदेश पाठवतात... मात्र, काहीही हाती लागत नाही... या अतिशय संवेदनशील घटनेचा तपास करताना पाेलिसांचे काैशल्य पणाला लागते... अखेर या साऱ्या मुली मुंबईला अभिनेता शाहरूख खानचा ‘मन्नत’ हा बंगला पाहण्यासाठी गेल्या असाव्यात असा धागा मिळताे अाणि त्या खराेखरच ‘मन्नत’समाेरच सापडतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडताे अाणि पाेलिसांना येताे काेवळ्या वयातील सिनेवेड काेणत्या थराला गेले अाहे याचा प्रत्यय ...
 
अश्वमेधनगर परिसरातील दाेन भावांच्या कुटुंबातील या मुली मंगळवारी (दि. २३) सकाळपासून घरातून गायब झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाइक-अाेळखीच्या ठिकाणी शाेध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. अाधीच गरिबीने गांजलेल्या या कुटुंबीयांना नाना शंकांनी घेरले. अखेर म्हसरूळ पाेलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यासमाेर कैफियतमांडली. त्यांनी क्षणाचाही विलंब करता तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. मुलींच्या कुटुंबियांची चाैकशी करता त्या अापसात ‘मुंबईला जाऊन शाहरूख खानचा बंगला पाहायचाय’, अशी चर्चा करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. मग पाेलिसांच्या तपासाला काहीशी दिशा मिळाली. निरीक्षक देशमुख यांनी उपनिरीक्षक सुवर्णा हांडाेरे, सुप्रिया विघे यांच्यासह हवालदार माळाेदे, किशाेर देवरे, उत्तम पवार, गणेश रेहरे यांचे पथक मुंबईला रवाना केले. बुधवारी बांद्रा येथील शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमाेर या मुली टरबूज खाताना पाेलिसांना दिसल्या. पाेलिसांना पाहून भेदरलेल्या या मुलींना नाशिकला अाणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात अाले. 
 
अाधी घेतले सप्तशृंगीदेवीचे दर्शन... 
वरिष्ठनिरीक्षक सुभाषचंद्र देशमुख‌ यांनी मुलींच्या अाई-वडिलांशी अास्थेने गप्पा मारल्यानंतर त्यांच्या बाेलण्यातून त्यांना मुंबईला शाहरूख खानचा बंगला पाहायचा असल्याचे कळले हाेते. त्यानुसार देशमुख‌ यांनी त्वरित मुंबईला पथक रवाना केले. तेथे या मुली सापडल्यानंतर पथकाला अाधी त्यांनी वणीला जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले मग त्या जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. यातील काही मुली त्यांच्या अाजीसाेबत यापूर्वी मुंबईला गेल्या हाेत्या, असेही समजले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...