आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या 4 रणरागिणी गाजविणार मुंबईतील आझाद मैदान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा क्रांती माेर्चात भाषण करण्यासाठी निवड झालेल्या तरुणींसह माेर्चात सहभागी हाेणाऱ्या नाशिकच्या महिला. - Divya Marathi
मराठा क्रांती माेर्चात भाषण करण्यासाठी निवड झालेल्या तरुणींसह माेर्चात सहभागी हाेणाऱ्या नाशिकच्या महिला.
नाशिक - मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभरातून दहा मुलींची निवड करण्यात अाली असू या मुली मुंबईतील अाझाद मैदानावर लाखाेंच्या जनसमुदयाला संबाेधणार अाहे. या दहा पैकी चार रणरागीणी नाशिकच्या असून त्या बुधवारी अापल्या करारी भाषणाने अाझाद मैदान गाजविणार अाहेत. 
 
मुंबईत क्रांतीदिनी अर्थात अाॅगस्टला सकाळी ११ वाजता मराठा क्रांती माेर्चास जिजामाता उद्यानापासून सुरुवात हाेणार असून अाझाद मैदानावर समाराेप हाेणार अाहे. यावेळी अाझाद मैदानावर मराठा समाजातील दहा तरुणींना अापले विचार मांडण्याची संधी मिळणार अाहे. नाशिकच्या दिव्या महाले, दिव्या साळुंके, काजल गुंजाळ अाणि रसिका सहाणे या चाैघींचाही समावेश यात समावेश असेल अशी माहिती संयाेजकांनी दिली अाहे. मुलींना सांभाळण्याची जबाबदारी छाया पाटील, माधवी पाटील अाणि राेहीणी दळवी यांच्यावर साेपविण्यात अाली अाहे. मराठा समाजाचा इतिसहास, देशातील याेगदान, समाजावर हाेणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या व्यथा अादी बाबींचा समावेश या चाैघींच्याही भाषणात असेल. नाशिकमध्ये या चाैघींकडून जाेरदार रंगीत तालिम करून घेण्यात अाली अाहे. यातील काजल गुंजाळ हिने नाशिकमधील माेर्चाच्या समाराेपप्रसंगी भाषण केले हाेते. 
 
साेशल माध्यमांत दिवसभर ‘एकच’ चर्चा 
मराठा माेर्चासंदर्भात व्हाॅट‌्स अॅपवर विविध ग्रुप तयार करण्यात अाले अाहेत. तसेच फेसबुकवर पेजेस तयार केले अाहे. या माध्यमातून माेर्चाची संपूर्ण माहिती देण्यात येत अाहे. मंगळवारी सकाळपासूनच माेर्चाविषयीच्या पाेष्ट टाकल्या जात हाेत्या. अनेकांनी अापल्या व्हाॅट‌्स अॅप अकाऊंटच्या डीपीवर मराठा क्रांती माेर्चाचा लाेगाे ठेवला अाहे. 
 
शैक्षणिक संस्थाचालकांनी दिल्या बसेस 
माेर्चात सहभागी हाेण्यासाठी काही महिन्यांपासून जिल्हाभरात नियाेजन सुरू अाहे. शहर, तालुक्यांसह खेडाेपाडी बैठका झाल्या असून, प्रत्येक गावातून वाहनव्यवस्था केली अाहे. माेर्चास्थळी पाेहाेचण्यासाठी वाहनांची जबाबदारी संबंधित गावकऱ्यांनीच घेतली अाहे. ज्यांचे नातेवाइक मुंबईत अाहेत, ते मंगळवारीच मुंबईत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड येथे मुंबईत जाणाऱ्यांची गर्दी हाेती. तसेच महामार्गावरही माेठ्या प्रमाणात वाहने दिसली. रस्त्याच्या एका बाजूने वाहने चालविणे, रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाट माेकळी करून देणे, विशिष्ट अंतरावर वैद्यकीय पथक तैनात ठेवणे, खाद्यपदार्थांची, पाण्याची व्यवस्था करणे, कचरा संकलनासाठी स्वतंत्र स्वयंसेवक तैनात करणे या नियाेजनात नाशिकच्या स्वयंसेवकांचा सहभाग अाहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>काळे शर्ट घालून निषेध, 
>पीडितेच्या व्यथा मांडणार- काजल गुंजाळ, विद्यार्थिनी
>गावा-गावांमध्ये फक्त माेर्चाचेच नियाेजन...
बातम्या आणखी आहेत...