आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवान खैरनार यांच्या पत्नीला लष्करात नोकरी देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो पथकाचे जवान मिलिंद खैरनार यांना वीरमरण आले. शहीद जवान मिलिंद खैरनार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेणार असल्याचे सांगत खैरनार यांच्या पत्नीने इच्छा व्यक्त केली तर लष्करामध्ये सामावून घेतले जाईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिली. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोराजवळील हाजीन सेक्टरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सैन्यदलातील जवान मिलिंद खैरनार हे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांची गुरुवारी (दि. १८) रोजी भेट घेणार असल्याचे भामरे यांनी या वेळी सांगितले. तसेच शहीद जवान खैरनार यांच्या कुटुंबीयांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांच्या पत्नीला नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. भारतीय सैन्यदलातील जवानांना देशसेवा करताना वीरमरण आले तर त्यांच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या विभागांतून सैन्यदलातर्फे आर्थिक मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  
 
मोदींच्या नेतृत्वाचा विजय डोकलाम वादावरून भारत-चीन सीमेवर अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी हा  वाद मिटवला. त्यामुळे डोकलाम वाद मिटला असून, हा मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...