आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्री तंत्रनिकेतनमध्ये ‘उडान 2017 ची धमाल, वार्षिक स्नेहसंमेलनात विविध स्पर्धांची रंगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक महाविद्यालयात नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा ‘उडान २०१७’ सोहळा उत्साहात पार पडला. प्राचार्य संजय बागुल यांच्या उपस्थितीत ‘उडान २०१७’ला सुरुवात करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख प्रा. मंगेश सानप, प्रा. दीपक थोरात, प्रा. सुभाष इंगावले, प्रा. विक्रांत निचित, प्रा. मोसिना शेख, प्रा. अर्जुन फाफळे, प्रा. सागर ठोंबरे, समन्वयक प्रा. अमोल टाके प्रा. महेंद्र धनाईत, महाविद्यालयीन शिस्त समितीचे प्रा. विकास कोम्बे, प्रा. रमेश आदमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
 
नाशिकरोड पोलिस विभागाचे पी. एस. गायकवाड त्यांच्या सहकाऱ्यांनी संमेलनाच्या दरम्यान उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्त्री सन्मान’ या नाटकातून महिलांबद्दलचा आदर सन्मान याचे चित्र उभे केले, या नाटकाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. ‘आमचे आदर्श आणि आम्ही’ या नाटकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जीवनावर विचार करायला लावून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. 
बातम्या आणखी आहेत...