आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरांचे छायाचित्र लहान; दुरुस्तीसाठी मग भागमभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या तिजाेरीचे ताबेदार असलेल्या लेखा विभागाकडून चुकांची पुनरावृत्ती सुरूच असून, महासभेने संमत केलेल्या अंदाजपत्रकात महापाैरांचे छायाचित्र लहान करण्यापासून तर माजी महापाैर उपमहापाैरांचा कार्यकाळ चुकवणे तसेच अाकडेवारीतही काही त्रुटी राहिल्यामुळे अखेर या अहवालाच्या दुरुस्तीची वेळ अाल्याचे वृत्त अाहे. विशेष म्हणजे, महापाैरांनी स्वत:च चुकांबाबत खरडपट्टी काढल्यामुळे नगरसेवकांना घरपाेच वाटप केलेल्या अंदाजपत्रकाच्या पुस्तिका परत घेण्यासाठी दाेन दिवसांपासून भागमभाग सुरू झाली अाहे. या सर्वात दुरुस्तीसाठी हाेणारा खर्च काेणाकडून वसूल हाेणार याबाबत स्पष्टपणे बाेलण्यास महापाैरांपासून ते लेखाधिकाऱ्यापर्यंत काेणीही तयार नाही. 
 
महापालिकेचा लेखा विभाग अत्यंत वादात असून, गेल्या काही दिवसांत अनेक गंभीर चुका या विभागाकडून झाल्या अाहेत. मध्यंतरी महापालिकेच्या कर्ज उचल व्याज परतफेडीच्या तक्त्यात लेखा विभागाने गंभीर चुका केल्या हाेत्या. सिंहस्थ कुंभमेळा, घरकुलासाठी हुडकाेकडून घेतलेले कर्ज व्याज याबाबतचा तक्ता देताना पहिल्या तीन वर्षांतील व्याज परतफेडीचे अाकडे मुद्दल कर्जाच्या २५ टक्क्यांपर्यंत गेले हाेते. त्यामुळे नेमके कर्जावरील व्याजाचा दर काय, असा प्रश्न उपस्थित झाला हाेता. अाता महासभेच्या अंदाजपत्रकात अनेक गंभीर चुका लेखा विभागाकडून झाल्याची चर्चा अाहे. प्रामुख्याने अंदाजपत्रकात महापाैरांचेच छायाचित्र लहान केले असून, उपमहापाैर, स्थायी समिती सभापती अायुक्तांसमवेत त्यांनाही स्थान दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. याव्यतिरिक्त अंदाजपत्रकातील काही अाकडेमाेड चुकल्याचे सांगितले जाते. माजी महापाैर नयना घाेलप यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळही चुकल्याचे सांगितले जाते. 

पट्टी चिकटवून केली जाणार दुरुस्ती : दरम्यान,महासभेच्या अंदाजपत्रकाच्या जवळपास दीडशे ते दाेनशे प्रती छापून तयार झाल्यानंतर दुरुस्तीचे अादेश अाल्यामुळे काय करायचे, असा पेच अाहे. दुसरी बाब म्हणजे, पुनर्छपाईसाठी खर्च काेणाकडून केला जाणार हा प्रश्न अाहे. तूर्तास महापाैर ठाकरे यांचे छायाचित्र नव्याने प्रिंट करून सुधारणा करणे अाकडेवारी कार्यकाळाच्या चुका पांढरी पट्टी चिकटवून त्यावर दुरुस्तीद्वारे करणे असा ताेडगा निघाल्याचे सांगितले जाते. 

लेखा विभागाने दिलगिरी व्यक्त केली 
^चुकाबाबत लेखाविभागाकडून दिलगिरीचे पत्र प्राप्त झाले अाहे. चुकांबाबत दुरुस्तीद्वारे सुधारणा हाेईल. नवीन छपाई हाेणार नाही.- रंजनाभानसी, महापाैर 

उद्धव ठाकरेही पिछाडीवर 
मुख्य म्हणजे, महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर स्थान देण्यात अाले. त्यामुळे केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची पालिकेतील नाराजी अाेढवण्याची भीती लक्षात घेता महापाैरांनी दुरुस्तीच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. 
बातम्या आणखी आहेत...