आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंगसह एमबीएच्या १५० विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील अभियांत्रिकी एमबीएच्या सहा काॅलेजांतील दीडशे विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी मिळाली अाहे. संदीप फाउंडेशन संचलित पाॅलिटेक्निक काॅलेज, एमबीए काॅलेज, के. के. वाघ, मुंजे इन्स्टिट्यूट, भुजबळ नाॅलेज सिटी यांचा यात समावेश अाहे. 
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी व्हावी, या उद्देशाने शहरातील अभियांत्रिकी एमबीए महाविद्यालयांत शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातात. या रोजगार मेळाव्यात एमबीएच्या ३७, तर पॉलिटेक्निकच्या २० विद्यार्थ्यांना उत्पादन निर्मितीसह आयटी क्षेत्रामधील १५ हून अधिक कंपन्यांकडून लाखो रुपयांचे पॅकेजेसअंतर्गत प्लेसमेंटची संधी मिळाली अाहे. शहरातील संदीप फाउंडेशन संचालित एमबीए महाविद्यालयात नुकताच प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे, विभागप्रमुख डॉ. राकेश पाटील, प्लेसमेंट अधिकारी प्रा. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखती प्रक्रिया निवड प्रक्रियेविषयी माहिती दिली. यात एकूण १३ कंपन्यांच्या एचआर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात ३७ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळाली. डेसिमल पाईंट अॅनालिटिक्समध्ये पाच विद्यार्थ्यांची, तर जस्ट डायल ४, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर १, डी मार्ट ४, टेक महिंद्रा २, मेट्रो ग्लोबल २, वेलनेस फॉर एव्हर २, टाटा कॅपिटल ३, योलो टेक्नोलॉजिस १, इ-क्लकर्स ५, आयआयएफएल या कंपनीने पाच विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना वार्षिक ते लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक पॅकेज मिळाले. 

के.के. वाघच्या ५५ विद्यार्थ्यांची निवड : के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एकूण ५५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून वार्षिक तीन लाख ५० हजारांपर्यंतचे प्लेसमेंटची ऑफर मिळाली आहे. एल अँण्ड टी इन्फोटेक आयटीतील प्रसिद्ध कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजी कंपनीने या विद्यार्थ्यांची निवड केली अाहे. यात अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांसह एमसीएच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. या पूल कँम्पसमध्ये प्री प्लेसमेंट टॉक, अप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल टेस्ट या निवड प्रक्रियेमधून केपीआयटी कंपनीत ४६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. तर एल अँण्ड टी इन्फोटेकमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अपेक्षा ढोका, अपूर्वा टिपरे, इशा अग्रवाल, रेणुका लेले, प्रथमेश पिंपळे, देवांशी दत्तानी, शंतनू राजपूत, आश्विनी भावसार या विद्यार्थ्यांची एल अँड टीमध्ये निवड झाली. प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी. के. शहाबादकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

डॉ.मुंजे इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांना संधी : डॉ.मुंजे इन्स्टिट्यूटमधील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड झाली. मार्व्हल टेक्नॉलॉजी, डब्ल्यूएनएस, फिनिक्स किचन, वेबविंग टेक्नॉलॉजी, झेड टेक कन्सल्टिंग या कंपन्यांनी मिळून १६ विद्यार्थ्यांची निवड केली. 

‘मेट’च्यालविशाला संधी : भुजबळनॉलेज सिटीतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीएची विद्यार्थिनी लविशा गुप्ता हिची सिनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी निवड झाली. कंपनीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध फेऱ्यांमधून ही निवड करण्यात आली. या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी एम. बी. ए. विभागाचे संचालक डॉ. नीलेश बेराड, दीपक वर्तक, श्रीनिवास चासकर स्वरूपा खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
संदीप इन्स्टिट्यूटच्या ३० विद्यार्थ्यांची निवड 
संदीप इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इण्टरव्ह्यूमध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड झाली. श्रीलक्ष्मी इंजिनिअरिंग, एफएनवाय टेक्नोसॉफ्ट, समर्थ इन्स्ट्रुमेंटशन, पूजा इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेेंटर, जान्हवी बिल्डकॉन, अमोल इंडस्ट्रिज, सिव्हिल टेक या कंपन्यात युवराज कदम, अमित सूर्यवंशी, नीलेश पवार, पुष्कर कुलकर्णी, नलिनी कुलकर्णी, प्रशांतकुमार जयस्वाल यांसह ३० विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...