आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अभ्यासक्रसाठी रविवारी ‘नीट’ परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मेडिकल बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. रविवारी (दि. ७) नीट प्रवेश परीक्षा होणार अाहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र सीबीएसइच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
 
बारावीनंतर इंजिनिअरिंग, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’व मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ या परीक्षा देणे अनिवार्य असते. सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार अाहे, तर नीट ही परीक्षा एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी मेडिकल कॉलेज तसेच डेंटल कॉलेजांसाठी घेतली जाते. मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही परीक्षा होणार आहे. 

नाशिक शहरातील परीक्षा केंद्रांमध्ये रविवारी (दि. ७) सकाळी १० ते दुपारी या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी पद्धतीच्या असून या पध्दतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यामध्ये १८० प्रश्न असतील ज्यांना पर्याय असतील. या परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना घेता येतील. यासाठी सीबीएसई एनईईटीच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढता येऊ शकते. 

गुणवत्तेला प्रोत्साहन मिळेल 
^अखिल भारतीय स्तरावर वैद्यकीयच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा घेतली जाणार असल्याने सर्वांना समान संधी मिळेल. तसेच गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. तसेच महाविद्यालयांनाही चांगले विद्यार्थी मिळू शकतील. -डॉ. संजय भावसार, प्राचार्य, डेंटल कॉलेज, पंचवटी 

नाशिकसह राज्यात सहा केंद्रे 
राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) राज्यभरातील लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होत असतात. एमबीबीएस, बीडीएस तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य असते. नीटसाठी नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...