आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयातच क्लार्कने अाेढत अाणत चाेपले शिपायाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जवादे यांच्याकडे आपली कैफियत मांडताना शिपाई तांबे. - Divya Marathi
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जवादे यांच्याकडे आपली कैफियत मांडताना शिपाई तांबे.
नाशिक- अामच्या हाॅस्पिटलमधील सर्वच डाॅक्टर कर्तव्यदक्ष अाहेत. कर्मचारीदेखील इमानइतबारे काम करतात. रुग्णांना सर्वप्रकारची वैद्यकीय सेवा पुरविली जाते, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या ईएसअाय हाॅस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर सराेज जवादे यांच्या कॅबिनमध्येच क्लार्कने एका शिपायाला डाॅक्टरांच्या कॅबिनमध्ये अाेढत अाणत चाेपले. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीसमाेर झालेल्या या प्रकाराने वैद्यकीय अधीक्षक अाेशाळल्या हाेत्या. 
 
सातपूर येथील ईएसअाय हाॅस्पिटलमध्ये रुग्णांचे अनुभव कटू अाहेत. बाेटावर माेजण्याइतके प्रामाणिक डाॅक्टर वगळता इतर डाॅक्टरांकडून फक्त शासकीय नाेकरी म्हणून वैद्यकीय सेवेकडे बघितले जात अाहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर खेकासणे, त्यांना साधा हातही लावता खाली मान घालूनच अाैषधी देणे, उर्मट भाषेत बाेलणे, पुरुष रुग्णांसमाेरच महिलांच्या अाजाराची चाैकशी करणे, असे प्रकार दरराेज घडत असतात.
 
डाॅक्टरांप्रमाणेच रुग्णालयातील काही कर्मचारी मद्यप्राशन करून तर काही गर्दीच्या वेळीही गायब असतात. इतकेच नव्हे तर कागदपत्रांचे कारण पुढे करून अनेकदा रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते. असे असले तरी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. जवादे यांच्याकडून सर्व व्यवस्थित असल्याचा दावा केला जाताे. 
 
 
साेमवारी सकाळी ११ च्या सुमारास डाॅक्टर जवादे यांच्या कॅबिनमध्ये डाॅक्टरांची बैठक सुरू असतानाच रुग्णालयातील सुहास पांचाळ या वरिष्ठ लिपिकाने रुग्णालयातील शिपाई संताेष तांबे यास सर्वांसमाेर खेचत अाणत वैद्यकीय अधीक्षकांच्या कॅबिनमध्ये चाेप दिला.
 
अधीक्षकांच्या कॅबिनमध्ये प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी बसल्याचे समजताच उर्वरित कर्मचारी डाॅक्टरांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच, तांबे यांची अास्थेने चाैकशी करताना मद्यप्राशन का करताेस? ते वाईट कृत्य अाहे, असे उपदेशाचे डाेस पाजले.
 
मात्र, उलटपक्षी अापण इमानइतबारे काम करत असताना फक्त अाेळखपत्र मागण्यासाठी लिपिकाकडे गेलाे असता त्यांना राग अाला त्यांनी मला तुमच्यासमाेरच मारले. तुम्ही काय कारवाई करणार हे सांगा? असा प्रश्न वैद्यकीय अधीक्षकांना विचारून त्यांना निरुत्तर केले.
 
बातम्या आणखी आहेत...