आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीची रजा नकोच, फक्त स्वच्छतेच्या सुविधा द्या- महिलांच्या प्रतिक्रिया...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना रजा देण्यात यावी, या शिवसेनेच्या मागणीला विविध क्षेत्रांतील महिलांना आक्षेप नोंदवला आहे. महिलांची जैविक गरज लक्षात घेता हा विचार चांगला असला तरी त्यामुळे महिलांच्या रोजगारावर आणि त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे महिला संघटनांचे म्हणणे आहे. शासनाने रजेऐवजी स्वस्त, सुलभ आणि आरोग्यदायी सॅनिटरी पॅड कसे मिळतील, स्वच्छ व पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे कशी उपलब्ध होतील याकडे अधिक लक्ष द्यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  
 
‘मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असतानाही समाजाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. या काळात होणारा शारीरिक त्रास महिला मुकाटपणे सहन करतात, त्यामुळे त्यांना पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा द्यावी,’ अशी मागणी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. परंतु याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील महिलांसह सामाजिक संघटना तसेच स्त्री प्रश्नाच्या अभ्यासकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उद्योग, वैद्यकीय आणि सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींची मते ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतली असता, मासिक पाळीची स्वतंत्र रजा नको, असाच सूर पुढे आला. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, उद्योजक, नोकरदार महिलांच्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...