आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी 23 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -अभियांत्रिकीसह आैषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांकरिता प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०१७ व २०१८ च्या प्रवेशासाठी शासनातर्फे ११ मे रोजी एमएचटी सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची मुदत आहे. ११ मे ही प्रवेशपरीक्षा हाेणार असून ४ जून राेजी निकाल जाहीर हाेणार अाहे.
 
सीईटी प्रवेशपरीक्षा ही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य असते.
 
राज्यभरातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश दिले जातात. राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे सीईटी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना १४ फेब्रुवारी ते २३ मार्च या दरम्यान परीक्षेकरिता नोंदणी करता येईल. 
 
अशी होईल परीक्षा : एमएचटी सीईटी या प्रवेश परीक्षेकरिता तीन प्रश्नपत्रिका असतील. त्यात भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी ५० गुण असलेली सामायिक प्रश्नपत्रिका असेल. गणितासाठी १०० गुण आणि जीवशास्त्र १०० गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...