आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय नसलेली ‘ती’ अाली कुठून याचा लागला थांगपत्ता, 'त्‍यांनी' गहाळ केली फाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एमअायडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात जमा असलेल्या एका उद्याेजकाच्या फाइलमधील कागदपत्रे अचानक गहाळ हाेतात, कार्यालयाकडून त्याचा कसून शाेध घेतला जाऊनही ती सापडत नाहीत अाणि अचानक साडेपाच महिन्यांनी ही कागदपत्रे कार्यालयातीलच एका खुर्चीत सापडतात. हातपाय नसलेली ‘ती’ अशी अचानक परतली तरी कशी? हा एकच प्रश्न सगळीकडे चर्चेत असताे. दरम्यान, फाइल प्रकरणावरून एमअायडीसी-पाेलिसांत कलगीतुरा रंगताे अाणि कागदपत्रे मिळाल्यावर अखेर एमअायडीसी पाेलिसांत तक्रार दाखल करते. अचानक ‘ती’ अाली कुठून याचा शाेध पाेलिस घेतल्यावर ज्याची फाइल हाेती, त्यानेच ती कर्मचाऱ्याच्या मदतीने गहाळ केली अाणि अाणूनही ठेवल्याच्या निष्कर्षापर्यंत पाेलिस येऊन ठेपतात. 
 
 
उद्याेजक इंदरपालसिंग सहानी यांनी त्यांच्या ते या भूखंडाचा अाैद्याेगिक वापर करता व्यावसायिक वापर केल्याने एमअायडीसीने त्यांना दीड काेटी रुपयांच्या दंडाची नाेटीस पाठविली हाेती. 
 
याच मालमत्तेची ही फाईल असून त्यातील ६६९ कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले जात हाेते. तशी तक्रार एमअायडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पाेलिसांत दिली, दाेन कर्मचाऱ्यांची चाैकशी झाली एमअायडीसी मुख्यालयाने त्यांच्यावर कारवाईही केली. मात्र, हे सगळे सुरू झाल्यानंतर सहानी यांनी एमअायडीसीकडे फाईल परत मिळावी याकरीता अर्ज केला. यानंतर अापसूकच ही फाईल प्रादेशिक कार्यालयात साडेपाच महिन्यांनी परत अाली. एमअायडीसीला कळवूनही त्यांनी एफअायअार दिला नाही, तसे झाले असते तर अातापर्यंत चाेर पकडले असते, अशी भूमिका पाेलिसांनी घेतली हाेती. त्यामुळे एमअायडीसीने एफअायअार िदला. जवळपास चार महिने तपासचक्रे फिरली अखेर सहानी यांनीच ही कागदपत्रे एमअायडीसीचा सर्वेअर बकरे याच्या संगनमताने गहाळ केली अाणूनही ठेवल्याचे पाेलिसांच्या तपासात स्पष्ट झाले अाहे. सहानी यांनाच या प्रकरणी अटक करण्यात अाल्याने उद्याेग वर्तुळात खळबळ उडाली अाहे. 
 
प्रादेशिक अधिकाऱ्यांची भूमिका ठरली महत्वाची 
या प्रकरणात एमअायडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी सुरुवातीपासूनच ‘कुणालाही पाठीशी घालणार नाही’, अशी कठाेर भूमिका घेतली हाेती. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल मुख्यालयात पाठविला. नंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई झाली. एफअायअारही दाखल केला. त्यामुळेच सहानी अाज तुरुंगात असल्याची चर्चा उद्याेग वर्तुळात अाहे. 
 
एमअायडीसी कार्यालयात नेऊन केली चाैकशी 
सहानी यांना अटकेनंतर पाेलिसांनी एमअायडीसीच्या कार्यालयात नेले. जेथून फाईल गेली अाणि परत अाली त्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला. उर्वरित काेठडीच्या काळात त्यांच्या निवासस्थान, कार्यालय, शाेरूमच्या ठिकाणी तपासणी केली जाणार असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. सहानी यांचा मुक्काम अाता अंबड पाेलिस ठाण्याच्या लाॅकअपमध्ये असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात अाल्याचेही नखाते यांनी सांगितले. 
 
सहानींना सहा दिवसांची काेठडी 
सहानी यांना शुक्रवारी (दि. २२) न्यायालयाने सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. तपासी अधिकारी सहायक पाेलिस अायुक्त अशाेक नखाते यांनी न्यायालयात बाजू मांडताना प्रकरणाचे गांभीर्य सांगत सरकारी कार्यालयातून फाइल लांबवून त्यातील महत्त्वाचे दस्तावेज चाेरत पुन्हा फाइल त्या ठिकाणी ठेवल्याचे सबळ पुरावे पाेलिसांच्या हाती लागले अाहेत, असे सांगितले. एमअायडीसीचा कर्मचारी संशयित बकरे याच्याशी संगनमत करून त्यांच्यामार्फत फाइल गायब केल्याचे तपासात स्पष्ट झाले अाहे. दाेघांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज, माेबाइलवरील संभाषण मिळाले असून अाणखी काही महत्त्वाची माहिती मिळवायची अाहे. त्यासाठी अाठ दिवसांच्या पाेलिस काेठडीची त्यांनी मागणी केली. न्यायालयाने दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकून घेत २७ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. 
बातम्या आणखी आहेत...