आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: एमआयडीसीतील भूखंड लाटण्याचे रॅकेट, ...तर अब्रुनुकसानीचा दावा का नाही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उद्याेजक इंदरपालसिंग साहनी यांनी गत अाठवड्यात एमअायडीसीकडून भूखंड वाटपात अनियमिततेचे गंभीर अाराेप केल्यानंतर अाता एमअायडीसीच्या कारभाराबाबत उद्याेजकांकडून तक्रारी सुरू झाल्या अाहेत. उद्याेजक राजेंद्र छाजेड यांनीही अाता यात उडी घेतली असून, काही उद्याेजकांनी पैशाच्या बळावर १५ ते २० भूखंड खाेटे प्रकल्प अहवाल सादर करून पदरात पाडून घेतले हेच भूखंड अाज दरमहा भाडे अाकारून लहान उद्याेजकांना भाड्याने दिले असल्याचा अाराेप त्यांनी केला अाहे. 
 
विशेष म्हणजे, एमअायडीसीत याची कुठेच नाेंद नसून, अशा गुंतवणूकदारांविरुद्ध तक्रारी करूनही एमअायडीसीने दखल घेतली नसल्याकडे लक्ष वेधून गुंतवणूकदारांचे हे रॅकेट उद्ध्वस्त झाले तरच नवउद्याेजकांना भूखंड मिळू शकतील, असेही छाजेड यांनी म्हटले अाहे. अाैद्याेगिक भूखंडाचा वापर व्यापारी उद्देशाने करणाऱ्या एका उद्याेजकाला दीड काेटीचा दंड एमअायडीसीने केला. मात्र, या प्रकरणी एमअायडीसीने स्वत:हून काहीच केले नाही तर या उद्याेजकाचे हे शाेरूम अनियमित असल्याचे दाखवून देण्यासाठी दुसऱ्या एका उद्याेजकाने माहितीच्या अधिकारात ३५७ कागदपत्रे जमवून एमअायडीसीकडे तक्रार केली हाेती. मात्र, एमअायडीसीने दुर्लक्ष केले हाेते. म्हणून शेवटी या उद्याेजकाने सेंट्रल गव्हर्नमेंट अाॅडिट डिपार्टमेंटकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर या संस्थेनेही दीड काेटी दंडाला दुजाेरा दिला. त्यानंतरही केवळ ही नाेटीस एमअायडीसीने संबंधित शाेरूम असलेल्या उद्याेजकाला बजावण्याचे पाेस्टमनसारखे काम केले अाहे. स्वत:हून काहीही केलेले नसल्याचे छाजेड यांनी म्हटले अाहे. दाेन महिन्यांत दाेनदा नाेटीस बजावूनही अद्याप वसुली का झाली नाही? अाणि वसुली झाली नाही तर जागा जप्तीसारखे पाऊल उचलण्यात का अाले नाही, तशी प्रक्रियाही अद्याप का सुरू झालेली नाही? असा प्रश्नही छाजेड यांनी उपस्थित केला अाहे. याच उद्याेजकाच्या संदर्भाने एक ६०० पानांची फाइल एमअायडीसीच्या कार्यालयातून गहाळ झाली. पाेलिस ठाण्यात तक्रार देऊन भूमापन अधिकाऱ्याचे नाव पुढे अाले, त्यानंतरही या कर्मचाऱ्याला बडतर्फ करता, त्याला केवळ समज समज देऊन याच कार्यालयात कामाची संधी कशी दिली गेली, याबाबतही छाजेड यांनी अाक्षेप नाेंदविला अाहे. 
 
एकीकडे नवउद्याेजकांना किंवा उद्याेजकांना अापल्या उद्याेगासाठी अथवा नवीन उद्याेग उभारणीसाठी अाैद्याेगिक वसाहतीत भूखंड मिळण्याची गरज असताना अशा उद्याेजकांनी त्याची मागणी केली असताना त्यांना भूखंड मिळत नाहीत. दुसरीकडे मात्र उद्याेगाच्या नावाखाली भूखंड लाटून ते व्यावसायिक कारणासाठी भाड्याने देण्याचा प्रकार सुरू अाहे. एमअायडीसीच्या या कारभाराबाबत अाता उद्याेग वर्तुळात चर्चा सुरू झाली अाहे. 

ज्या उद्याेजकाला दीड काेटीच्या दंडाची नाेटीस एमअायडीसीने दिली, त्याच उद्याेजकाने एमअायडीसीला लेखी पत्र देऊन सर्व अधिकारी भ्रष्ट लाचखाेर अाहेत असे कळविले. तरी एमअायडीसीचे अधिकारी गप्प का? या उद्याेजकावर अब्रुनुकसानीबद्दल एफअायअार का दाखल केला गेला नाही? असा सवालही छाजेड यांनी विचारला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...