आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननीत 1035 उमेदवारांचे अर्ज वैध; 106 बाद, पक्षातील या घडामाेडी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - महापालिका निवडणुकीच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी दंड थाेपाटणाऱ्या १४८३ उमेदवारांपैकी १०६ उमेदवारांचे अर्ज छाननीअंती बाद ठरले असून, १०३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले अाहेत. दरम्यान फेब्रुवारी राेजी यापैकी काेण माघार घेते हे बघणे महत्त्वाचे अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारी राेजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपली. या मुदतीत १२२ जागांसाठी १४८३ उमेदवारांनी २१६१ अर्ज भरले. या अर्जांची दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी १० वाजेपासून छाननी सुरू केली. छाननीत प्रामुख्याने उमेदवारी अर्जावरील त्याची स्वाक्षरी, शपथपत्र पक्षाच्या ए.बी, फॉर्मची कसून तपासणी झाली. 
 
यात प्रामुख्याने शिवसेनेच्या अाठ उमेदवारांचे अर्ज एबी फार्म नसल्यामुळे अवैध ठरवण्यात अाले. दरम्यान, या कारवाईला कायदेशीर अाव्हान देण्याची तयारी संबंधितांनी सुरू केली अाहे. प्रामुख्याने पंचवटीत प्रभाग क्रमांक मधील चार जागांवर ए.बी. फॉर्म काेरा दाखल झाल्यामुळे उमेदवारांची अडचण प्रत्येक राजकीय पक्षाकडून अापल्या अधिकृत उमेदवारांना फाॅर्म दिला जाताे. त्यात उमेदवाराचे नाव, पक्षातील पद अाणि काेणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार अाहे.  याची माहिती द्यावी लागते. 
 
उमेदवारी अर्ज भरताना संबंधित कागदपत्र, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. बऱ्याचदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी राहतात. त्यामुळे अर्ज बाद ठरताे. अशा परिस्थितीत पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडणुकीतूनच बाहेर पडताे. या पार्श्वभूमीवर पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून बी फाॅर्म दिला जाताे. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचे नाव दिलेले असते. 
 
जर छाननीदरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढताे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी वाजेपर्यंत एबी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पाेहोचणे बंधनकारक असते. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का वा झेराॅक्स चालत नाही. 
 
फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे चुका टाळण्यासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवारांचे नाव टाकलेले अर्ज देऊन टाकतात. उमेदवाराने ताे काळजीपूर्वक भरून निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करायचा असताे. 
 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेचा एबी फाॅर्मबाबतचा गाेंधळ सुरूच राहिल्याने त्याचा फटका तब्बल अाठ उमेदवारांना बसला असून, त्यांना अाता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार अाहे. तर, एका उमेदवाराच्या बाबतीतील प्रकरण साेमवारपर्यंत पुढे ढकलण्यात अाले अाहे. यंदाच्या निवडणुकीत प्रारंभी शिवसेनेचा वरचष्मा दिसत असताना अाता तब्बल अाठ ते नऊ जागांवर अधिकृत उमेदवारच नसल्याने त्याचा फायदा भाजपला हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे. 
 
भाजपशी सुरू असलेल्या स्पर्धेच्या नादात अति सावध भूमिका घेत शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केली नाही. त्यातच एबी फाॅर्म वाटप करण्याची व्यवस्थाही एकहाती लावण्यात अाल्याने एेनवेळी फाॅर्म वाटप करताना माेठाच गाेंधळ उडाला. त्यातून अनेकांना उशिरा फॉर्म हाती लागले.
 
तर काहींच्या हाती फाॅर्म हाती लागलेच नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी वाजेनंतर एबी फाॅर्म देणाऱ्यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळू शकत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केले हाेते. प्रत्यक्षात वाजेपर्यंत एबी फाॅर्म जमा करता अाले नाहीत. त्यामुळे हे अर्ज बाद ठरविण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...