आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक घेणाऱ्यांवर आता नाशिककरांचा विश्वास नाही, मनसेचे सरपाेतदार यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, पालिकेवर भाजपची सत्ता अाल्यानंतर सहा महिन्यांत शहराला विविध समस्यांनी ग्रासले अाहे. यामुळे दत्तक घेणाऱ्यांवर नाशिककरांचा अाता विश्वास राहिला नसल्याची टीका मनसेचे शहर सरचिटणीस निखिल सरपाेतदार यांनी केली अाहे. 
 
त्यांनी म्हटले की, नाशिक शहरात पहिल्याच पावसात पावसामुळे नालेसफाई झाल्याने गटारी तुंबल्या. त्यामुळे जुने नाशिक तसेच नाशिक शहरातील अनेक भागात दुर्गंधी पसरली अाहे. तसेच कचरा साठल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे साथीच्या अाजाराच्या नागरिक, लहान मुले आजारी पडले आहेत. डास प्रतिबंधक धूरफवारणी नाल्यावर औषध फवारणी केली गेली नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहनचालक नागरिक जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहे. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. तसेच शहरात पार्किंग व्यवस्था वाढविण्याची गरज असताना पार्किंग समस्येकडे दुर्लक्ष करून पार्किंग नसल्याकारणाने नागरिक आपली वाहने इतरत्र पार्क करीत आहेत. नो पार्किंगच्या नावाखाली ठेकेदाराकडून नागरिकांची वाहने उचलून घेऊन जात आहेत. पार्किंगसारख्या मूलभूत सेवेची गरज असताना नागरिकांना भुर्दंड साेसावा लागत आहे. शहरात सहा महिन्यांत कुठल्याही प्रकारची विकासकामे झाली नसून नाशिक शहराच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे नाशिकचा विकास साधावा, अशी मागणी यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...