आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेत अाता नवनिर्माणाचे वारे; अाठवडाभरात युवा नेत्यांना पदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाेकसभा विधानसभा निवडणुकीतील दाणादाण पक्ष स्थापनेपासून असलेल्या जुन्या शिलेदारांनी पक्षाला दिलेली साेडचिठ्ठी यानंतर डळमळीत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अाता नवनिर्माणाचे वारे पुन्हा वाहू लागले असून, त्याचाच एक भाग म्हणून येत्या अाठवडाभरात युवा नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन शहर कार्यकारिणीत सक्रिय केले जाणार अाहे. यामध्ये प्रभागाध्यक्षापासून इतर महत्त्वाची पदे भरली जाणार असून, खुद्द राज ठाकरे हेच त्याबाबतची अधिकृत घाेषणा नाशिक दाैऱ्यात करण्याची शक्यता अाहे.
मनसेच्या महानगरप्रमुखपदाची सूत्रे राहुल ढिकले यांनी स्वीकारल्यानंतर अद्याप शहर कार्यकारिणी जाहीर झालेली नाही. किंबहुना, अशी कार्यकारिणी गठित करण्यासाठी हालचाली सुरू असताना पक्षाला माेठे खिंडार पडले. या वादळात पदाधिकारीच काय, परंतु नगरसेवकही पक्षात राहतात की नाही, अशी शंका निर्माण झाली हाेती. पक्षप्रमुख राज यांच्या दाैऱ्यात नाराज नगरसेवक उघडपणे पाठ फिरवत असल्यामुळे फेरबदलाचे सुकाणू फिरवावे की नाही, असा पेच हाेता. दरम्यान, गेल्या वर्षभरात प्रभाग समिती िनवडणूक अन्य काही ना काही कारणाने मनसेतील नाराज गट नेमका काेण, याची पूर्णपणे चाचपणी झाली अाहे. काही पदाधिकारी पक्षाबाहेर पडले अाहेत, तर काही पक्षात राहून याेग्य संधीची वाट बघत अाहेत. दरम्यान, अाता पक्षात फारसे बंड हाेणार नाही, असा विचार करून शहर कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत.

महापालिकेत सत्ता असल्यामुळे दीड वर्षावर अालेल्या िनवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शहरात केलेले नवनिर्माण लाेकांपर्यंत पाेहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्याशिवाय पक्षापुढे पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे सध्या पक्षात सक्रिय असलेल्यांना बढती देण्यासाठी खुद्द ठाकरे यांनीच सूचना केल्याचे समजते.

ही पदे भरणार
उपशहराध्यक्ष,सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष याबराेबरच प्रभाग अध्यक्ष, विभागप्रमुख अादी पदांसाठी खांदेपालट हाेणार अाहे. मात्र, जे पदाधिकारी सध्या चांगल्या पद्धतीने काम करीत अाहेत, त्यांना दुखावता अधिक जबाबदारी साेपवली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. महापालिकेत मनसेच्या महिला नगरसेवकांची संख्या माेठी अाहे. महिलांच्या अनुपस्थितीत त्यांचे सक्रिय असणाऱ्या पतींकडूनच माेठ्या प्रमाणात कामे केली जातात. प्रभागातही त्यांचा चांगला संपर्क असल्याचे लक्षात घेऊन त्यांना सक्रिय केले जाणार असल्याचे सांगितले जाते.