आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : मोबाइल लुटणारे 2 अटकेत, 1 अल्पवयीन ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातून मोबाइल हिसकावून चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. रविवारी (दि. १६) रात्री गंगापूर पोलिसांनी गंगापूर गाव येथे ही कारवाई केली. 
 
गंगापूररोड, महात्मानगर येथे मोबाइल लूटमार करण्याचे प्रकार घडत होते. गंगापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या अाधारे संशयितांचा माग काढला. विल्सन ऊर्फ गौरव अशोक राठोड, कल्पेश मनोज गुंजाळ (दोघेही रा. गोवर्धन) यांना पथकाने राहत्या घरी अटक केली. या संशयितांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीचे एक लाखाचे मोबाइल हस्तगत करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत.