आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइलचाेर पळाले; अन‌् पुन्हा ताब्यात, मुंबईनाका पाेलिस ठाण्यातील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोबाईल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी सर्वत्र शोध घेत महामार्ग बसस्थानक परिसरात संशयितांना पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी (दि. १३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईनाका पोलिस ठाण्यात हे नाट्य घडले. 
 
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईनाका पोलिसांनी दोन संशयितांना मोबाइलचोरीच्या संशयावरून चौकशीसाठी भारतनगर परिसरातून ताब्यात घेतले होते. दुपारी गुन्हे शोधपथकाने त्यांना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाच्या खोलीत ठेवले. पोलिस इतर कामांत व्यस्त असताना दोघांनी लघुशंकेचे निमित्त करून पोलिसांच्या हातावर तुरी दिली. गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिस ठाणे परिसरात शोध घेतला; मात्र संशयित सापडले नाही. काही अनुभवी कर्मचाऱ्यांनी आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेऊन शोधसत्र राबवत दोघांना सायंकाळी पोलिस ठाण्यातून पळालेले माेबाइलचाेर ताब्यात महामार्ग बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले काहीदिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये सर्व पोलिस ठाण्यात ‘डीबी’ बरखास्त करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांना नवखे पोलिस कर्मचारी ओळखत नसल्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही घटले आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात नवख्यांना डीबी पथकात संधी देण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यात अडचण निर्माण होत असल्याचे या घटनेतून निदर्शनास आले. गुन्हे उघडकीस येण्यासाठी प्रभारी निरीक्षकांकडूनही धडक कारवाई होत नसल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. अवैधधंदेही जोरात : मुंबईनाकापोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये पोलिस ठाणे, गुन्हे शाखेच्या ‘सुभेदारां’ना जळगाव जिल्हा परिषद निवडणूक बंदोबस्तासाठी पाठवले आहे. मात्र, यादीत मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या ‘सुभेदारा’चे नाव नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. 
 
‘हॉट’ पोलिस ठाणे 
मुंबईनाकापोलिस ठाणे शहरातील सर्वात ‘हॉट’ पोलिस ठाणे म्हणून ओ‌ळखले जात आहे. सर्वात जास्त झोपडपट्टीबहुल परिसर असल्याने गुन्हेगारांचे हेडक्वार्टर म्हणूनच या भागाची ओ‌ळख आहे. पोलिस ठाणे स्थापन झाल्यापासून एक वर्षातच तीन निरीक्षक बदलण्यात आले असले, तरी या वरिष्ठांकडून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी धडक कारवाई होत नसल्याने एेन निवडणुकीत गुुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे निदर्शनास येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...