आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांत फक्त 334 माेबाइल चाेरीची नाेंद, सापडलेही फक्त 86; शाेधकार्यावरच प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोबाइल वापरणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या संख्येबरोबरच मोबाइल चोरी वा हरविण्याच्या घटनांतही रोजच भर पडत आहेत. 
काही हजारो रुपये किमतीचे मोबाइल दुकान, बाजारपेठेतून वा रहदारीच्या रस्त्यावरून हातोहात लंपास करणाऱ्या टोळ्या शहरात कार्यरत असल्याची बाब अनेकदा उघड झाली आहे. असे असतानाही मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या मोबाइल तपासासाठी सायबर पोलिस कार्यरत असले, तरी गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. या अपयशावर तांत्रिक कारणे देत एकप्रकारे पांघरूण घालण्याचेच काम केले जात आहे. मोबाइल चाेरी झालेल्या तक्रारीच्या तुलनेत तक्रारदारांना मोबाइल परत मिळवून देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी सायबर शाखेतील कर्मचारी वाढवून ही शाखा अधिक कार्यरत करण्याची गरज आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. 
 
ब्लॅक स्पाॅटकडे अद्यापही दुर्लक्षच 
याभागातील बाजारपेठ, भाजी बाजार असे ब्लॅक स्पॉट टार्गेट करून या ठिकाणी कार्यरत असलेल्या टोळयांच्या मुसक्या आवळ्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासाठी या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 
शहरातील विविध पाेलिस स्टेशनला ट्रेस झालेले माेबाइल - भद्रकाली-५५, नाशिकराेड-१०, पंचवटी-१२०, अाडगाव-०१, गंगापूर-४१, इंदिरानगर-०५, सातपूूर-०६, अंबड-०१, उपनगर - २४, सरकारवाड-७६, देवळाली कॅम्प-२, मुंबईनाका - ७, म्हसरुळ - 
 
चाेरी गेलेला मोबाइल सापडलाच नाही 
^गंगापूररोड परिसरातून जात असताना मोबाइल हिसकावून नेण्यात आला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेकवेळा पाठपुरावाही करण्यात अाला. मात्र, अद्यापपर्यंत मोबाइलचा तपास लागलेला नाही. -अमाेल घुगे, विद्यार्थी
 
पाेलिसांचे विविध प्रयत्न सुरूच अाहेत 
^टेक्निकल अॅनालायसेसच्या माध्यमातून मोबाइल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराऱ्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच जे बेवारस मोबाइल सापडले आहे. त्यांच्या आयएमआय नंबरद्वारे तक्रारदारांना मोबाइल परत देण्यात येत आहे. मोबाइल चोरी झाल्यानंतर त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. विजय मगर, पोलिसउपायुक्त 
 
अायएमइअाय बदलल्याने अडचणी 
^चोरी गेलेल्या मोबाइलचा आयएमइआय क्रमांक सिमकार्ड पुरविणाऱ्या कंपन्यांना देण्यात येतो. त्या मोबाइलमध्ये सिमकार्ड अॅक्टिव्ह झाल्यानंतर त्या दृष्टीने तपास केला जातो. अनेकदा मोबाइलचे आयएमइआय क्रमांक बदलल्याने शोधकार्यात अडचणी येतात. त्यामुळे ते गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. अनिल पवार, वरिष्ठपोलिस निरीक्षक, सायबर पोलिस 
 
सिमकार्ड नसले तरीही दुरुपयोग शक्य 
मोबाइल ट्रेस होणे किंवा पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी चोराकडून मोबाइलमधील सिमकार्ड तातडीने काढून फेकून दिले जाते. मात्र, त्यानंतरदेखील वायफाय कनेक्ट करून त्या मोबाइलद्वारे मूळ मालकाच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. मोबाइलमध्ये पे-टीम, मोबाइल बँकिग, फेसबूक, व्हॉट्सअॅपसारखी अॅप्लिकेशन्स असतात. जुजबी माहितीच्या आधारे ही अॅप्लिकेशन्स वापरली जाऊ शकतात. तसेच, मोबाइलच्या मेमरी कार्डमधील माहितीही संबंधित व्यक्तीच्या हाती लागू शकते.
 
असा लावतात मोबाइलचा शोध 
{मोबाइल चोरी गेल्यानंतर यासंदर्भात त्या पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली जाते. {मोबाइल चोरीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडे तपास दिला जातो. 
{तांत्रिक विश्लेषणासाठी सायबर शाखेची मदत घेतली जाते. 
{सायबर पोलिसांकडून चोरी गेलेला मोबाइलचा अायएमइअाय नंबर सिमकार्ड पूरविणााऱ्या कंपन्यांना देण्यात येता. 
{जर त्या आयएमइअाय नंबरवर नवीन सिम अॅक्टिव्ह करण्यात आले तर त्याबाबतची माहिती सिम कंपन्यांमार्फत पोलिसांना कळवली जाते. 
{त्यानुसार शोध घेऊन मोबाइल कोणत्या ठिकाणी आहे याबाबत माहिती घेऊन चोरट्यांकडून किंवा जो तो मोबाइल वापरता त्यांच्याकडून मिळविला जातो. 
 
स्पेअर-पार्ट््सचा धंदा तेजीत 
चोरी झालेले मोबाइल जसेच्या तसे किंवा आयएमइआय बदलून विकणे किंवा वापरात आणणे अधिक जोखमीचे असते. त्या तुलनेत या मोबाइलला पूर्णपणे उघडून त्याचे स्पेअर-पार्ट वेगवेगळे करुन विकण्याचा धंदा चांगलाच तेजीत आहे. शहरात अनेक दुकानांत अनधिकृत सॉफ्टवेअर्स सापडले आहेत. मात्र, स्पेअर्सच्या बाबतीत पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागलेले नाहीत. वाहनांप्रमाणेच मोबाइलच्या स्पेअर-पार्टची बाजारपेठदेखील मोठी आहे. चोरीचा मोबाइल हातात आल्यानंतर काही मिनिटांत त्याचा डिस्प्ले, टच पॅड, कॅमेरा, मदरबोर्ड, स्पीकर असे सर्वच भाग बाजूला काढले जातात. त्या मोबाइलची ओळख कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी मदरबोर्डवरील महत्त्वाचे पार्टदेखील सुरक्षितपणे हटविले जातात. नंतर हेच पार्ट महागड्या दराने ग्राहकांच्या नादुरुस्त झालेल्या मोबाइल्सला बसविले जातात. त्यातूनही जवळपास चोरीच्या मोबाइलच्या किमतीएवढी रक्कम संबंधित व्यक्तीच्या हाती पडते. 
 
गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य 
शहर परिसरातील १३ पोलिस ठाण्यांमध्ये रोजच मोबाइल चोरी वा हरविल्याची तक्रार नोंद केली आहे. मात्र, चाेरी झालेल्या मोबाइलचा तपास लागल्याचे प्रमाण अगदी बोटावर मोजण्याइतपतच आहे. 
 
गहाळची नाेंद 
माेबाइल चाेरीची संख्या मोठ्या प्रमाणावर अाहे. गुन्हे कमी दाखविण्यासाठी पोलिसांकडून गहाळ झाल्याची तक्रार नाेंदविली जाते. हातातून मोबाइल हिसकावून वा वर्दळीच्या भागातून चोरून नेला तरी गहाळचीच नाेंद हाेत असल्याने चाेरीची संख्या कमी दिसते. 
 
अल्पवयीन गुन्हेगार 
मोबाइल चोरीमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा अधिक समावेश असल्याची बाब समोर आली आहे. वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना पोलिसांना अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळीला अटकाव घालण्यात अपयश येत असल्याने पोलिसांच्या तपासावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 
 
दबाव नाही 
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असली, तरी या गुन्ह्यांचा तत्परतेने शोध घेण्याचा दबाब पोलिस अधिकाऱ्यांवर नसल्यानेही हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. मोबाइल चोरीबाबत नागरिकांकडून विचारणा झाल्यास तपास सुरू आहे असेच उत्तर देण्यात येते. मात्र, प्रतिष्ठित वा राजकीय क्षेत्रातील नागरिकांचे मोबाइल शोधण्यात पोलिसांनी तत्परता दाखवत मोबाइलचा शोध घेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. 
 
तांत्रिक विश्लेषण शाखेकडून चोरी गेलेला मोबाइलचे आयएमइआयए क्रमांकाद्वारे शोध घेतला जातो. मात्र, अनेकदा चोरी गेलेल्या मोबाइलचा आयएमइआयए नंबरच बदलण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामुळे पोलिसांना त्या गुन्हेगारांपर्यंत पोहाेचता येत नाही. काही दिवसांपूर्वी मालेगाव ग्रामीण पोलिसांनी मोबाइल आयएमइआयए क्रमांक बदलणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...